AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कांदा पिक व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिक व्यवस्थापन
सप्टेंबर ते आक्टोंबर महिन्यात होणाऱ्या कांदा लागवड व त्यासाठी लागणारे पिक व्यवस्थापन हे महत्वाचे असते. कांदा लागवड करण्याआधी जमीन खोल नांगरून घ्यावी व एकरी ८ ते १० टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे उभ्या आडव्या काकऱ्याघालून आपल्या सोयीनुसार वाफे तयार करून घ्यावेत. कांदा लागवड करण्याआधी तण नियंत्रणसाठी १.५ मिली ऑक्सिफ्लोरोफेन प्रती लिटर पाण्यात फवारले तर ४५ दिवसापर्यंत तणांचा उपद्रव होत नाही.
कांदा लागवड करतान कांद्याच्या रोपमधील अंतर हे १५*१० सेंमी असणे आवश्यक आहे. कांद्याची खतमात्रा हि एकरी ५० किलो युरिया,५० किलो १०:२६:२६ ,२० किलो बेनसल्फ असावी. सुरवातीला लागवडीवेळी युरियाची अर्धी मात्रा स्फुरद,पालाश, आणि सल्फर ची संपूर्ण मात्रा द्यावी व ३० ते ४० दिवसांनी उरलेली मात्रा पिकांना द्यावी कांदा लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी १९:१९:१९ विद्याव्य खताची फवारणी करावी तसेच ६० दिवसानंतर ०:५२:३४ या विद्राव्य खताची फवारणी केल्यास पिकांची जोमदार वाढ होते. कांद्यावरील करपा रोगासाठी मॅन्कोझेब ३० ग्राम प्रती पंप पाण्यात १५ ते २० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी तसेच रस शोषक किड्यासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ ई.सी १० मिली प्रती पंप फवारावे किंवा डायमिथोएट ३० ई.सी २५ मिली प्रती पंप फवारावे. फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर कांदा शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
118
0