AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
साखरेची टंचाई नाही, भाव वाढू देणार नाही: राम विलास पासवान
कृषि वार्ताEconomic Times
साखरेची टंचाई नाही, भाव वाढू देणार नाही: राम विलास पासवान
नवी दिल्ली: देशामध्ये साखरेची टंचाई नाही आणि आगामी सणाच्या काळात साखरेचे किरकोळ भाव स्थिर राहतील, याची सरकार काळजी घेईल, असे आज केंद्रीय अन्न मंत्री राम विलास पासवान म्हणाले.
सध्या, साखरेचा किरकोळ दर रू.43 प्रती किग्रॅला स्थिर आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडे असलेल्या डेटानुसार मागच्या वर्षी या काळात तो रू.40 प्रती किग्रॅ होता, त्यापेक्षा हा दर थोडासा जास्त आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट् या प्रमुख उत्पादक राज्यात साखरेची टंचाई नाही. सणासुदीच्या दिवसात आम्ही भाव वाढू देणार नाही. साखरेचे भाव स्थिर राहतील याची आम्ही खात्री करू.” अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांना म्हणाले. “देशामध्ये पुरवठ्यामध्ये तुटवडा नाही आणि सणाच्या काळात देशांतर्गत पुरवठ्यात भर घालण्यासाठी शासनाने दक्षिणेकडील कारखान्यांना 25 टक्के सवलतीच्या आयात शुल्काने 3 लाख टन कच्ची साखर आयात करायला परवानगी दिली आहे.” असे पासवान म्हणाले. देशामध्ये साखरेचा साठा 27.7 दशलक्ष टन इतका आहे, ज्यामध्ये 2016-17 मधील देशांतर्गत 20.2 दशलक्ष टन उत्पादनाचा तसेच 5,00,000 टन आयातीचा आणि 7 दशलक्ष टनाच्या मागील वर्षीच्या साठ्याचा समावेश आहे. आधी, नॅशनल कोऑपरेटीव्ह कंझ्युमर्स को-ऑपरेशन (NCCF) च्या वार्षिक सर्व साधारण सभेला संबोधित करताना पासवान म्हणाले, संस्थेने 7.02 कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत 2016-17 या आर्थिक वर्षात रू.3.15 कोटींचा नफा मिळवला आहे. संदर्भ - द इकॉनॉमिक टाईम्स, 20 सप्टेंबर 17.
10
0