कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
वाराणसी येथे तांदूळ संशोधन केंद्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील चांदपूर येथे ‘आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र’ सुरू केले आहे. या केंद्राचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मोदी म्हणाले, या संशोधन केंद्रामध्ये तांदळाचे उत्पादन आणि गुणवत्ता अधिक उत्तम बनविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या केंद्राचा फायदा फक्त पूर्वेकडील राज्यास नाही तर संपूर्ण राज्यांना होणार आहे. बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, झारखंड आदी राज्यात मोठ्या प्रमाणात भात लागवड केला जातो. या संशोधन केंद्रात काळे मीठ, राजरानी, बादशाह पसंत आणि काळा तांदूळ सारख्या विविध प्रकारांच्या उत्पादनावर संशोधन केले जाणार आहे.
पूर्व हवामान आणि मातीत निर्माण होणारा सुगंध, बासमती आणि मंसुरीसोबत अन्य हायब्रिड प्रकारांची गुणवत्ता, लागवड,चव,सुगंध आणि पौष्टिकता यामध्ये अधिक वाढविण्याचा प्रयत्न या संशोधन केंद्रात केला जाणार आहे, तसेच या केंद्रामध्ये विविध वाणांचे उत्तम जनुके घेऊन नवीन वाण विकसित करण्याचा प्रयत्नदेखील केला जाणार आहे. मधुमेह हा आजार लक्षात घेता, या तांदूळची गुणवत्ता ही सुधारण्याचे कार्य केले जाईल. हे ‘तांदूळ संशोधन केंद्र’ पूर्वेकडील सर्वात मोठया स्तरावर असलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या केंद्राला उभारण्यासाठी ९३ करोड इतका खर्च करण्यात आला आहे. या संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यापूर्वी पंतप्रधानांनी प्रयोगशाळेचे व लायब्ररीचे ही निरीक्षण केले. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २९ डिसेंबर २०१८
5
0
संबंधित लेख