AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आधुनिक पद्धतीने शेवंती फुलपिकाची लागवड
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आधुनिक पद्धतीने शेवंती फुलपिकाची लागवड
सर्व राज्यांमध्ये विशेषत: दसरा, दिवाळी, नाताळ आणि लग्नसराईत शेवंतीच्या फुलांना प्रचंड मागणी असते, त्यामुळे शेवंतीची लागवड करणे फायद्याचे ठरते.
जमीन :_x000D_ शेवंती पिकासाठी योग्य जमिनीची निवड नेहमीच फायदेशीर ठरते. ज्या जमिनीचा सामू ६.५ ते ७ आहे, अशा जमिनी लागवडीसाठी चांगल्या असतात. मध्यम हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी. _x000D_ हवामान :_x000D_ शेवंती हे कमी दिवसांचे पीक आहे. म्हणजेच शेवंतीला फुले येण्यासाठी कमी दिवस व कमी तापमानाची आवश्यकता असते. सुरूवातीच्या वाढीच्या काळात भरपूर सूर्यप्रकाश व मोठा दिवस असणे आवश्यक आहे. शेवंतीच्या वाढीसाठी २० ते ३० अंश से., तर फुल येण्यासाठी १० ते १७ अंश से. तापमानाची आवश्यकता असते._x000D_ जाती : _x000D_ आपल्या भागातील मागणीनुसार शेवंतीच्या वाणांची निवड करावी._x000D_ खत व्यवस्थापन : _x000D_ शेवंती लागवडीपूर्वी जमीन तयार करताना एकरी १०-१२ टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्यावेळी नत्र-स्फुरद-पालाश अनुक्रमे १०० किलो युरिया १२० किलो डीएपी :१२० किलो पालाश प्रति एकरी विभागून द्यावे, तर लागवडीनंतर एक ते दीड महिन्याने ६० किलो नत्र प्रति एकरी या प्रमाणात द्यावे. _x000D_ आंतरमशागत : _x000D_ वेळोवेळी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावे. निंदणीमुळे जमीन भुसभूशीत राहून पिकाची जोमदार वाढ होते. झाडाची वाढ मर्यादित राहण्यासाठी आणि अधिक उत्पादनासाठी शेवंतीच्या झाडाचा शेंडा खुडण्याचा प्रघात आहे. शेंडा खुडण्याचे काम लागवडीनंतर साधारणतः चौथ्या आठवड्यानंतर करावे. शेंडा खुडल्याने अधिक फुटवे फुटून फुलांच्या उत्पादनात वाढ होते._x000D_ फुलांची काढणी :_x000D_ शेवंतीच्या पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करावी. शक्यतो फुले सूर्योदयापूर्वी काढावीत. उमललेली फुले उशिरा काढल्यास रंग फिका पडतो व वजनही कमी भरते. जातीनुसार फुलांची काढणी लागवडीनंतर तीन ते पाच महिन्यांनी सुरू होते. ती पुढे एक महिना चालते. लवकर उमलणाऱ्या जातींचे एकूण चार ते सहा, तर उशिरा उमलणाऱ्या जातींचे आठ ते दहा तोडे होतात._x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेन्ट्रर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
575
0