AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गांडूळ खत तयार करण्याची पद्धत
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
गांडूळ खत तयार करण्याची पद्धत
गांडूळ खत जमीन सुधारण्याच्या व पिकाच्या वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. गांडुळाचे मुख्य काम हे सेंद्रिय पदार्थ, ह्युमस व माती यांचे एकत्रित मिश्रण करणे व ते जमिनीच्या विविध थरांत पसरणे हे आहे. त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. गांडुळाच्या विष्ठेमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम व सूक्ष्म अन्नघटक असतात. त्यामुळे जमिनीचा सामू योग्य पातळीत ठेवण्यासाठीही मदत होते. गांडुळांची निवड - फायटोफॅगस, एपीजी किंवा ह्युमस फॉर्मर या गटातील गांडुळे यशस्वीपणे गांडूळ खत तयार करतात. या उलट एंडोजीज जीओफेगस जमिनीत खोल जाणारी गांडुळे गांडूळ खत तयार करण्यासाठी उपयोगी पडत नाहीत.
गांडूळ खत कसे तयार करावे - • शेण, शिल्लक वैरण, काडीकचरा, पिकांची धसकटे अर्धवट कुजलेली असावीत. जमिनीच्या पृष्ठभागावर गादी वाफा तयार करावा. खड्डा करण्याची गरज नाही. • जमिनीवर सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचा (पाचट, धसकट इ.) २-३ इंच जाडीचा थर घालावा. त्यामध्ये गांडुळे सोडावीत. नंतर हा गादीवाफा गोणपाटाने झाकून घ्यावा. • वाफ्याचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादेत ठेवावे. सामू ६.५ ते ७.५ असावा. ४५ ते ५० टक्के ओलावा असावा. • गांडूळखत तयार करण्यात येणारा वाफा हा सावलीत असावा. • वाफ्यातील मातीची ढेकळे हाताने फोडावीत व आठवड्यातून एकदा वाफ्यातील कचरा खाली-वर करावा. • या पद्धतीने महिना- सव्वा महिन्यात चहाच्या पावडरसारखे खत तयार होईल. हे तयार खत वेगळे करावे. • तयार झालेले खत काढण्यापूर्वी गांडुळाच्या वाफ्याला आठ दिवस पाणी घालू नये व खताचे छोटे छोटे ढीग तयार करून ठेवावेत म्हणजे गांडुळे तळाशी जातील. • गांडूळ खत वेगळे करावे व न कुजलेले भाग गांडुळांना परत खायला घालावेत. गांडूळ खत वेगळे करताना शक्‍यतो कुदळ, टिकाव व फावडे यांचा वापर करू नये. त्यामुळे गांडुळांना इजा पोचणार नाही. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
275
0