AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फवारणी दरम्यान होणारी विषबाधा थांबण्यासाठी उपाय योजना
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फवारणी दरम्यान होणारी विषबाधा थांबण्यासाठी उपाय योजना
यवतमाळ मध्ये कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान शेतकऱ्यांना विषबाधा होऊन जीवितहानी झाली. त्यामध्ये अन्य अनेक कारणे असली तरी कीटकनाशकांचा वापर करताना अत्यंत सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
विषबाधा होण्याची कारणे- • सध्या विदर्भात उष्ण वातावरण व प्रखर उन आहे बऱ्याच ठिकाणी कपाशीची लागवड ओळीने केली असल्याने कपाशीची वाढ ४ ते ६ फुटापर्यंत झाली आहे पिकामध्ये गर्दी असल्या कारणाने हवा व सूर्य प्रकाश खेळता राहत नाही पर्यायाने पिकामधील सूक्ष्म वातावरण रसशोषक किडीसाठी पोषक ठरते त्यामुळे दाटलेल्या कपाशीमध्ये चालणेही अवघड असते.त्यामुळे फवारणी करणे अत्यंत अवघड होते . • फवारणीचे द्रावण नाकात, अंगात व डोळ्यात जाते त्यामुळे विषबाधा होते. • उष्ण व दमटउन्हामध्ये फवारणी करते वेळी शरीर घामाने व कीटकनाशकांच्या द्रावानामुळे सतत ओले राहते. • अनेक जण मजुरीने फवारणीचे कामे करतात त्यामुळे ते सतत कीटकनाशकांचा संपर्कात राहतात. • दाट वाढलेल्या कपाशीमध्ये पंपाची दांडी सहज खाली फिरवता येत नसल्यामुळे फवारणीचे द्रावण चेहऱ्यावर उडून विषबाधा होण्याची शक्यता होते. • फवारणीचा योग्य पद्धतीचा अवलंब न करण्यामुळे विषबाधेच्या शक्यतेत वाढ होते (उदा.हवेच्या विरुध्द दिशेने फवारणी करणे ,उन्हात फवारणी करणे,फवारणी करताना तंबाखू मळणे इ.) कीटकनाशक हाताळताना काय केले पाहिजे - • पिकावरील कीड प्राथमिक अवस्थेत असतानाच किडींचा प्रादुर्भाव वाढू नये यावरील किडींसाठी ५% निंबोळी अर्क ५ मिली प्रती लि पाणी या प्रमाणे फवारणी करावी. • फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावीत्यावेळीहवेचा वेग कमी असतो व द्रावण अंगावर उडत नाही . • सतत फवारणी करणाऱ्या मजुरांनी सुरक्षा साधनांचा वापर केला पाहिजे • किटकनाशाकांच्या संपर्कात आल्याने डोकेदुखी, मळमळ,चक्कर येणे हि लक्षणे दिसल्यास त्वरित दवाखान्यात जा . • किटकनाशाके नामांकित कंपनीचे घ्यावे सोबत लेबल वरील माहिती वाचून सुचनांचे पालन करावे . • कीटकनाशके लहान मुलांपासून दूर ठेवावे . • प्लास्टिक बादलीमध्ये पाणी घेऊन कीटकनाशकांची आवश्यक शिफारशीत मात्रा मोजून मिसळावी काठीने चांगले ढवळून मिश्रण आवश्यक क्षेत्रासाठीच्या पाण्यामध्ये मिसळून फवारणीचे द्रावण तयार करावे.
3
0