गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटोमधील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
टोमॅटो मधील फळ पोखरणारी अळी ही वेगळ्या रंगाची आणि 3 सेंमी लांब असते आणि बहुतेकवेळा तिचा रंग हिरवा किंवा तपकिरी असतो. एक अळी एकापेक्षा जास्त फळांचे नुकसान करू शकते आणि त्यामुळे कमी संख्येने असली तरी ही मुख्य कीड ठरू शकते.
फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन (एकात्मिक कीड व्यवस्थापन) -
• टोमॅटोच्या शेतात आणि शेताभोवती पिवळ्या झेंडूची फुले लावा. या अळीचा प्रौढ कीटक झेंडूच्या फुलांवर अंडी घालणे पसंत करतो. पुढच्या पिढ्या तयार होणे टाळण्यासाठी ठराविक काळाने झेंडूची फुले तोडा. ट्रायकोग्रामा, या अंड्यावरील परजीवीचे कार्य सुद्धा जास्त असते.जैविक नियंत्रणाचा लाभ घ्या.
• अळ्या हाताने वेचून काढा आणि पुढच्या पिढ्या कमी करण्यासाठी अळ्या नष्ट करा.
• टोमॅटोची काढणी सुरू झाल्यावर, प्रती हेक्टर 40 कामगंध सापळे लावा आणि दर 21 दिवसांनी आमिष बदला.
• NPV @ 250 LU/हेक्टर फवारा. NPV ची परिणामकारकता वाढवण्यासाठी त्यात 15 ग्रॅम गूळ आणि स्टिकर घाला.
• BT बेस पावडर @ 1 किग्रॅ/हेक्टर फवारा आणि जैविक कीडनाशकांचा फायदा घ्या.
• निंबोळी पावडर 50 ग्रॅम (5%) किंवा नीम तेल 50 मिली किंवा निंबोणीवर आधारित तयार द्रावण 20 मिली (1% EC) ते 40 मिली (0.15% EC) 10 लिटर पाण्यात घालून 15 दिवसांच्या अंतराने फवारा.
• मिरीड बग हा परभक्षी किडा या अळीच्या अंड्यावर उपजीविका करतो आणि त्यामुळे या परभक्षी किड्यांची संख्या जास्त असेल तर कीटकनाशक फवारणे टाळा.
• प्रत्येक काढणीत प्रादुर्भावग्रस्त फळे वेगळी करा आणि त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावा.
• क़्विनालफॉस 25% EC @ 20 मि.ली.किंवा क्लोरांट्रानिलीप्रोल 18.5% SC @ 3मिली किंवा सिंट्रानिलीप्रोल 10.26 % OD @ 10 मिली किंवा फ्लुबेन्डीयामिड 39.35% फवारा.35% SC @ 3 मिली किंवा फ्लुबेन्डीयामिड 20% WG @ 5 ग्रॅम किंवा नोव्हाल्युरॉन 10% EC @10 मिली किंवा क्लोरांट्रानिलीप्रोल 8.8% +थायोमेथोक्साम 7.5% SC @ 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारा प्रत्येक फवारणीच्या वेळी कीटकनाशक बदला.
डॉ. टी.एम. भरपोडा,
माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र,
बी.ए. कृषी विद्यालय, आनंद कृषी विद्यापीठ, आनंद 388 110 (गुजरात भारत)