गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मूग, चवळी, उडीदमधील शेंग पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
साधारणत: शेतीमध्ये मूग, चवळी व उडीदच्या पिकामध्ये फुल व शेंगाच्या अवस्थेतील टप्प्यावर ठिबके असलेल्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. या अळया शेंगेला छिद्र करून शेंगामध्ये प्रवेश करून, आतील भाग खाऊन टाकतात. या अळ्या शेंगामधील आतील भाग खातात त्यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करतात.
ही अळी हिरव्या रंगाची असते तसेच तिच्या शरीरावर काळ्या रंगाचे केस असतात. पूर्ण वाढ झालेल्या अळीवर ६ ओळी असतात व काळ्या रंगाचे ठिबके राहतात. त्याला ठिबके असलेली ‘शेंगा पोखरणारी अळी’ असे म्हणतात.
व्यवस्थापन –
• ब्रकोनोइड कुळामधील परजीवी हे ठिबके असलेल्या शेंगा पोखरणाऱ्या अळीची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवतात.
• जर प्राथमिक अवस्थेत प्रादुर्भाव असेल, तर निंबोळी आधारित पावडर (५%) किंवा निमतेल ५० मिली प्रति पंप फवारणी करावी किंवा बवेरीया बॅसियाना @४० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
• जर किडींचे प्रमाण जास्त असेल, तर क्विनोलफॉस २५ इसी @२० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्लू पी @१० ग्रॅम क्लोरॅणट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @३ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
• इमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्लू पी @५ ग्रॅम किंवा फ्लूबेंडीमाइड ४८० एस सी @ २ मिली किंवा क्लोरॅणट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @३ मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
• जर ठिबके असलेली शेंगा पोखरणारी अळी चवळी पिकावर दिसून आल्यास इंडोक्साकार्ब १४.५ एस सी @३.५ मिली किंवा स्पिनोसॅड ४५ एस सी @ १.६ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्लू पी @३ ग्रॅम १० लिटर पाण्यात फुल अवस्थेत असताना फवारणी करावी व दुसरी फवारणी ७ दिवसानंतर करावी.
• जर किडीचा प्रादुर्भाव मूग पिकावर दिसून आल्यास फ्लूबेंडीमाइड ४८० एस सी @ २ मिली किंवा क्लोरॅणट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @३ मिली फुल अवस्थेच्यावेळी असताना प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी व दुसरी फवारणी ७ दिवसानंतर करावी.
डॉ. टी.एम. भरपोडा,
माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र,
बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!