गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
करडईमधील मावा किडींचे व्यवस्थापन
मावा किडींच्या जास्त प्रादुर्भावामुळे करडई पिकांचे नुकसान होते. हा आकाराने थोडासा मोठा असतो. या किडींच्या उपद्रवामुळे झाडे काळे होतात, परिणामस्वरुप प्रकाश संश्लेषणातील क्रिया रोखली जाते आणि वनस्पती वाढीवर परिणाम होतो. एकात्मिक व्यवस्थापन - • करडईची योग्यवेळी पेरणी केल्यास मावा किडींचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो.
• सामान्यत: परभक्षी व परजीवी या किडींना नियंत्रणाखाली ठेवते. • मावा किडींच्या प्राथमिक अवस्थेत निम आधारित कीटकनाशकाची १० मिली (१.० ईसी) ते ४० मिली (०.१५ %) प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. • जर वातावरणात जास्त आर्द्रता असल्यास वर्टीसेलीअम लेकानी जैविक कीटकनाशकाची @ ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. • फॉस्फोमिडोन ४० ईसी@१० मिली किंवा १० मिली अॅसेफेट ७५ एसपी @१० ग्रॅम किंवा इमाडाक्लोप्रिड १७.८ एस एल @४ मिली किंवा क्विनोलफॉस २५ इसी @२० मिली किंवा डायमेथोएट ३० इसी @१०मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
217
0
संबंधित लेख