AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिकातील विषाणूजन्य रोगाचे नियंत्रण!
सल्लागार लेखअ‍ॅग्री फार्मिंग
पिकातील विषाणूजन्य रोगाचे नियंत्रण!
पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन केल्यास चांगल्या प्रतीचे व जास्त उत्पादन मिळण्याची शक्यता असते. विषाणूजन्य रोगांमुळे प्रचंड आर्थिक नुकसान होते. बहुतेक विषाणू किडींमार्फत पसरतात, परंतु काही विषाणू संक्रमित रोपांच्या जखमांद्वारे यांत्रिकपणे पसरतात. संक्रमित झाडे पानांचे पिवळसर होणे, पानांचे विकृति येणे यासारखी लक्षणे दिसतात. व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय:- 1) जर एखाद्या क्षेत्रामध्ये विषाणूजन्य रोगाचा सतत प्रादुर्भाव होत असल्यास त्याठिकाणी पिकांची फेरपालट करणे आवश्यक आहे. 2) पिकाची लागवड करत असताना, निरोगी रोपे, बियाणे किंवा कंदांची निवड करावी. 3) सापळा पिकांच्या लागवडीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून बचाव होतो. उदाहरणार्थ, पांढर्‍या माशीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भेंडीमध्ये झेंडू. 4) पिकातील व भोवतालचे तण नियंत्रित करा. जेणेकरून तणांवर या किडी उपजीविका करणार नाहीत. 5) विषाणूला प्रतिरोध करणाऱ्या वाणांची निवड करावी. 6) कीटकनाशकांचा वापर करून किडींचे नियंत्रित केल्यास व्हायरस वहन होण्यापासून रोखण्यास मदत होते. 7) पिकामध्ये छाटणी, कलम किंवा लागवड करतेवेळी वापरात येणारी साधने आणि उपकरणे स्वच्छ करून वापरावीत. 8) तसेच काही बियाणांवर कोमट पाण्याची प्रक्रिया केल्यास देखील या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत मिळते.
संदर्भ:- अ‍ॅग्री फार्मिंग हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
145
0
इतर लेख