क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे व्यवस्थापन!
पाने खाणारे अळी (स्पोडोप्टेरा), लष्करी अळी आणि केसाळ अळी याच्या अंड्यांमधून लहान लहान अळ्या पानाच्या खालच्या भागात राहतात आणि पानांतील हरितद्रव्ये खातात. • पाने अर्धपारदर्शक बनतात. • मोठ्या अळ्या पाने खातात आणि पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमित आकाराचे छिद्र करतात. • जास्त प्रादुर्भाव असल्यास पानांवर पूर्णपणे विकृती दिसून येते. • तसेच उंट अळ्या पानांवर राहते आणि पिकाला नुकसान करते. • पिकाभोवती एरंड रोपांची लागवड करावी. पाने खाणाऱ्या अळीचे प्रौढ पानांच्या खालच्या पृष्ठभागावर अंडी घालते. अशी अंडी पानावर दिसून आल्यास पाने काढून नष्ट करावीत. • पाने खाणार्‍या अळीचा एनपीव्ही (न्यूक्लियर पॉलिहेड्रोसिस व्हायरस) आता उपलब्ध आहे, अळीच्या नियंत्रणासाठी @२५० एलई प्रति हेक्टर ५०० लिटर पाण्यात फवारणी करावी. • सेंद्रीय पद्धतीने पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी बॅसिलस थुरिंजेनिसिस, हि जिवाणूजन्य आधारित पावडर @ १५ ग्रॅम किंवा बव्हेरिया बॅसियाना हि बुरशी आधारित पावडर @ ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • निमार्क १% ईसी @२० मिली किंवा निमार्क ०.१५% ईसी @४० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • पिकामध्ये जास्त प्रादुर्भाव असल्यास क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५ एससी @३ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी @ १० मिली किंवा थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५०% झेडसी @३ मिली किंवा इंडोक्साकार्ब १५.८ एससी @१० मिली किंवा फ्ल्युबेंडामाईड २० डब्ल्यूजी @५ ग्रॅम किंवा स्पिनॅटोरम ११.७ एससी @ १० मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४.९० सीएस @ ५ मिली किंवा डीडीव्हीपी ७६ ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • प्रत्येक वेळी फवारणी करताना कीटकनाशके वेगवेगळी वापरावीत.
संदर्भ : अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सीलेंस., ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेयर करा.
77
26
संबंधित लेख