क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आंबा पिकातील फळ माशीचे नियंत्रण!
भारतात विविध जातींच्या आंब्यांची लागवड केली जात आहे. इतर देशांतही आंबा निर्यात करून शेतकर्‍यांना नफा मिळत आहे. आंब्यांची निर्यात खराब फळांची नसावी किंवा फळ माशीचा प्रादुर्भाव झालेला नसावा. ज्यामुळे फळांचे नुकसान होईल, अन्यथा, पाठविलेले उत्पादन परत केले जाऊ शकते. साधारणपणे फळ माशी प्रादुर्भाव येण्यापूर्वीच आंब्यात पिकण्याची प्रक्रिया सुरू होते आणि म्हणून कोणत्याही प्रकारची कीटकनाशक फवारणी टाळण्यासाठी सल्ला दिला जातो._x000D_ • खाली गळून पडलेली फळे गोळा करून जमिनीत गाडावीत._x000D_ • वेळोवेळी झाडांना मातीची भर द्यावी. त्यामुळे फळ माशी उडून जाते._x000D_ • बागेचे भोवती तुळशीची रोपे लावावीत व त्या रोपांवर वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी करावी. माश्या या रोपांवर एकत्रित गोळा होत असल्याने त्यांचे नियंत्रण होते._x000D_ • मिथाईल युजेनॉल प्ले वूड ब्लॉक फेरोमोन सापळे अ‍ॅग्रोस्टारमध्ये उपलब्ध आहेत, बागेत एकरी ५-७ सापळे बसवावेत. असे सापळे घरीही तयार करता येतात. एकदा बसवल्यानंतर पुन्हा बदलण्याची आवश्यकता नाही._x000D_ • नवसारी कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार बॉक्स नेट सापळे हि स्वतः बनवता येतात. या उद्देशाने, मिथाइल युजेनॉल + सॉल्व्हेंट + डायक्लोरोव्हॉस (४:६:१) चे मिश्रण तयार करा. काही वेळा नंतर तयार केलेला बॉक्स या द्रावणामध्ये बुडवा किंवा ब्रशच्या साहाय्याने हे द्रावण बॉक्सला लावा. माशीच्या प्रवेशासाठी बॉक्सवर मोठे छिद्र तयार करा. यानंतर बॉक्समध्ये अडकलेल्या माश्या प्रत्येक आठवड्यात गोळा करून नष्ट करा. _x000D_ • आंबाच्या झाडाच्या सर्व बाजूंना विष अमिश (सडलेला गूळ ५०० ग्रॅम + डीडीव्हीपी ७६ ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी._x000D_
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
29
2
संबंधित लेख