AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभऱ्यातील घाटे अळीचे व्यवस्थापन
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभऱ्यातील घाटे अळीचे व्यवस्थापन
या कीटकाच्या अळीमध्ये बरेच प्रकार आहेत. अळी फिकट गुलाबी, पिवळ्या, हिरवट काळी किंवा तपकिरी रंगाची असू शकते. ह्या कीटकाच्या शरीराच्या दोन्ही बाजूंना उभ्या पांढऱ्या रेषा असतात. अळी नवीन पानांवर आणि घाट्यांवर चट्टे तयार करते. अळी अतिशय वेगाने वाढते आणि फुले तसेच घाटे खाऊ लागते. जेव्हा हरभऱ्याच्या झाडाला घाटे धरण्यास सुरूवात होते, तेव्हा या घाट्यांना छिद्रे पाडणे आणि आपले अर्धे शरीर घाट्यात घालणे हे या अळ्यांचे वैशिष्ट्य आहे.
o नर कीटक पकडण्यासाठी, प्रती हेक्टर 40 कामगंध सापळे लावावेत. त्यामुळे, मादी कीटकाने घातलेली अंडी अफलित राहतात कारण नर कीटकांच्या संख्येत घट झालेली असते. अशाप्रकारे प्रत्येक पिढीत प्रादुर्भाव कमी होतो. जर ही पद्धत एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणावर वापरली तर अधिक चांगला परिणाम मिळू शकतो. o प्रौढ कीटक निशाचर असतात, त्यामुळे ते प्रकाशाकडे आकर्षिले जातात. त्यामुळे, शेतात जिथे जिथे प्रकाशव्यवस्था करणे शक्य असेल तिथे विजेच्या सर्व दिव्यांखाली पाण्याने भरलेले ट्रे ठेवा. तसेच पाण्यात कीटकनाशकाचे 1-2 थेंब घाला. रात्री, कीटक प्रकाशाकडे आकर्षित होतील, पाण्यात पडतील आणि मरतील. ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे. o ह्या अळीचे एन.पी.व्ही. उपलब्ध आहे. पिकात लहान अळ्या दिसताच, एन.पी.व्ही.चे 250 एल.व्ही. फवारा. त्यामुळे अळ्यांमध्ये विषाणूजन्य आजार पसरून त्यांच्यावर विपरीत परिणाम होईल आणि शेवटी अळ्या मरतील. o ह्या कीटकांच्या अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांसाठी शेतात पक्षीथांबे उभारा. o सुरूवातीला, बिव्हेरिया बॅसियाना (1 x 10 9) 10 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारा. o घाटे अळी विरुद्ध संरक्षणासाठी फेनवॅलेरेट 20 EC 10 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36SL 10 मिली किंवा लँबडा सायहॅलोथ्रीन 5 EC 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारा किंवा फेनव्हलेरेट 0.4% पावडर @ 25 किग्रॅ/हेक्टर साठी वापरा. o हिरव्या हरभऱ्याच्या काढणीसाठी पीक लावले असेल तर 500 ग्रॅम (5% अर्क) निंबोळी पावडर 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा, हा उपाय हरभऱ्यातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी प्रभावी आहे. बाजारात उपलब्ध असलेले लगेच वापरण्याजोगे निंबोळीवर आधारीत औषध सुद्धा वापरता येईल. यासाठी, तयार औषध 20 मिली (1 EC) ते 40 मिली (0.15 EC) किंवा 50 मिली निंबोळी तेल + 10 ग्रॅम धुण्याचा सोडा 10 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारा. o घाटे अळीचा गंभीर प्रादुर्भाव असेल तर, इमामेक्टिन बेन्झोएट 5 SG 3 ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 EC 4 मिली किंवा फ्लुबेन्डीयामिड 48 SC 5 मिली किंवा थिओडीकार्ब 75 WP 20 ग्रॅम किंवा क्लोरान्ट्रीनीप्रोल 20 SC 5 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा आणि अळ्यांच्या विरुद्ध पिकाचे संरक्षण करा. o जरी कीटकनाशके वापरली तरी प्रौढ आणि परिपक्व अळ्या मरत नाहीत. शक्य असेल तर अशा अळ्या हाताने गोळा करून नष्ट कराव्यात. o हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे की फवारणी करताना प्रत्येकवेळी आपण कीडनाशक बदलणे आवश्यक आहे. डॉ. टी. एम. भारपोडा माजी कीटकशास्त्र प्राध्यापक बी. ए. कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर, आनंद कृषी विद्यापीठ, आनंद - 388 110 (गुजरात भारत)
316
1
इतर लेख