जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पाहा, मिरची, लसूण व केरोसीन अर्कचा वापर
काही महत्त्वाच्या अळी व किडींच्या नियंत्रणासाठी मिरची, लसूण व केरोसिन अर्क हे वनस्पतीजन्य कीटकनाशके तयार करण्याच्या स्वदेशी तंत्रांपैकी एक आहे. शेंगा पोखरणारी अळी, तुडतुडे, लष्करी अळी आणि इतर किडींचा प्रादुर्भावमुळे पिकांना आर्थिक नुकसान होते त्यासाठी मिरची, लसूण व केरोसिन अर्क हे एक प्रभावी जैविक कीटकनाशक आहे. आवश्यक साहित्यः १. लसूण - ५० ग्रॅम २. हिरवी मिरची - २५ ग्रॅम ३. केरोसिन - १० मिली ४. साबण - १२ मिली ५. पाणी - ३ लिटर ६. धारक ७. १ एकर क्षेत्रासाठी, १ किलो लसूण, अर्धा किलो अद्रक आणि अर्धा किलो मिरचीची गरज आहे. तयार करण्याची पद्धत :- १. लसूण एका पेस्टमध्ये पिसणे; रात्रभर केरोसिनमध्ये लसूण आणि मिरची पेस्ट सोडा (१२ तास). २. ५० मिली पाणी टाका. ३. पाणी, धुण्याची पावडर सर्व घटक मिसळा. अर्क गाळून चांगले ढवळून त्याचे मिश्रण तयार. ४. फवारणी करण्यापूर्वी चांगले ढवळून फवारणी करावी. वापण्याची पद्धत: प्रादुर्भाव झालेल्या झाडावर १० मिली/लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सीलेंस
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
230
1
संबंधित लेख