AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बोरापासून बनवा प्रक्रियायुक्त पदार्थ
फळ प्रक्रियाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बोरापासून बनवा प्रक्रियायुक्त पदार्थ
दुष्काळ परिस्थितीतही मोठ्या प्रमाणात उत्पादन देणार फळपिक म्हणजे बोर. परंतू काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे व प्रक्रियेच्या अपुऱ्या सोईसुविधामुळे फार मोठ्या प्रमाणात फळांचे नुकसान होत आहे. एकाचवेळी फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे दर कोसळून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अशावेळी विक्रीचे नियोजन करून तसेच त्यापासून बाजारात मागणी असलेले मूल्यवर्धित पदार्थ तयार करून त्या पदार्थाचे विक्री व्यवस्थापन केले तर शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.
बोर कॅन्डी:- बोराच्या पूर्ण तयार झालेल्या फळापासून उत्कृष्ट कॅन्डी तयार करता येते. त्यासाठी चांगली, निरोगी फळे निवडून पाण्याने स्वच्छ धुवून बोचनीच्या सहाय्याने बोरला भोके पाडून घ्यावीत व कॉर्क बोररच्या साह्याने बिया काढून टाकाव्यात व बोरे उकळत्या पाण्यात ३ ते ४ मिनिटे धरावीत. नंतर जाळीवर पसरवून प्रति किलो बोरास २ ग्रॅम प्रमाणे गंधकाची २ तास धुरी द्यावी. धुरी दिल्यानंतर पहिल्या दिवशी ५० टक्के तीव्रतेच्या साखरेच्या पाकात २४ तास ठेवावीत. प्रति लिटर पाकास १ गॅम प्रमाणे सायट्रिक अॅसिड टाकावे. दुसऱ्या दिवशी साखर घालून पाकाची तीव्रता ६० टक्के करावी व पुन्हा २४ तास ठेवावी. तिसऱ्या दिवशी पाकाची तीव्रता ७० टक्के करून पुढील ३ ते ४ दिवस बोरे पाकात पुर्णपणे बुडतील याची काळजी घ्यावी. नंतर पाकातून काढून चांगली निथळून २ ते ३ दिवस फॅन खाली किंवा ड्रायरमध्ये वाळवून घ्यावीत. वाळल्यानंतर वजन करून पॉलिथीनच्या पिशवीत भरून थंड व कोरड्या जागी ठेवावी. • संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
144
0