AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात ६ नोव्हेंबरला मुसळधार पाऊस
मान्सून समाचारलोकमत
राज्यात ६ नोव्हेंबरला मुसळधार पाऊस
पुणे – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘महा’ या चक्रीवादळाची तीव्रता पुढील ६ तासांत वाढण्याची शक्यता आहे. ४ नोव्हेंबरनंतर ते गुजरात किनारपट्टीकडे वळण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ नोव्हेंबरला पालघर, नाशिक जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या चक्रीवादळामुळे अरबी समुद्र ३ ते ६ नोव्हेंबरच्यादरम्यान खवळलेला राहणार असून महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीवर ताशी ११० ते १३० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्यांनी समुद्रात जाऊ नये. ६ नोव्हेंबरला कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाटयाचा वारा वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. संदर्भ – लोकमत, ४ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
68
0