समाचारTV9 Marathi
LPG सिलिंडर बुकिंगवरही आता ९०० रुपयांपर्यंत कॅशबॅक!
👉 गेल्या काही दिवसांमध्ये इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी संकटामुळे सामान्यांच्या किचनमधील बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिक कोणतीही खरेदी करताना जमेल तितकी बचत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
👉 या पार्श्वभूमीवर Paytm ची एक खास ऑफर कॉमन मॅनसाठी फायद्याची ठरू शकते. या ऑफरमुळे तुम्हाला घरगुती सिलेंडरच्या खरेदीवर 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.
👉 इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, जो ग्राहक पहिल्यांदा पेटीएम अॅपद्वारे LPG सिलिंडर बुक करेल, त्याला 900 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे तुम्हाला 3 वेळा LPG सिलिंडर बुकिंगवरही 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.
Paytm वरुन सिलेंडर बुक कसा कराल?
* सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
* अॅप लॉगीन केल्यानंतर, तुम्हाला सिलेंडर बुकिंग या पर्यायावर क्लिक करावे.
* त्यानंतर सर्च ऑप्शनवर जाऊन त्यात Recharge And Bill Pay या ऑप्शनवर क्लिक करु शकता.
* यामध्ये तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस असे तीन कंपन्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी एका पर्यायाची तुम्ही निवड करावी.
* गॅस प्रोव्हायडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा LPG ID क्रमांक टाकावा लागेल.
* यानंतर पुढील प्रोसेस फॉलो करुन तुम्ही सिलिंडर बुक करु शकता.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- TV9 Marathi,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.