AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाटा पिकातील कंद माशीचे जीवनचक्र
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पिकातील कंद माशीचे जीवनचक्र
पोषक पिके:- बटाटा, टोमॅटो, वांगे, तंबाखू इ. ओळख: - पूर्णपणे विकसित अळी सुमारे १५-२० मिमी असते. शरीररचना लांबलचक आणि शरीराचा रंग हलका हिरवा आणि डोके रंग तपकिरी असते. प्रौढ पतंग तपकिरी रंगाचे असतात. नुकसान: - या किडीची अळी अवस्था पिकास हानिकारक आहे. हि कीड शेतात आणि साठवण केलेल्या दोन्ही ठिकाणी बटाट्याचे नुकसान करते. स्टोरेज हाऊसमध्ये साठवलेल्या बटाट्याच्या डोळ्यातून आत शिरतात व बटाटे पोखरतात. अशा प्रादुर्भावग्रस्त कंदांच्या (बटाटा) पृष्ठभागावर काळ्या रंगाची विष्टा दिसते. नियंत्रण:- • निरोगी बटाटा बेणे वापरावे. • पिकाची पेरणी १ नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी करावी. • पिकास योग्य वेळी मातीची भर आणि आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, अन्यथा जमिनीत कंद उघडे पडतात. • जेव्हा ७५ टक्के पाने सुखलेली दिसतात तेव्हा बटाटा काढणी करावी. • काढणी झालेल्या कंदांमधून निरोगी कंद निवडा आणि त्यांना स्टोअर हाउसमध्ये त्यांच्यावर २५ सेमी वाळूचा ठार पसरवून ठेवा. जेणेकरून मादी कंदांवर अंडी घालू शकणार नाही.
संदर्भ:- व्हिक्टोरिया नॉरेम हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा!
31
0