AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
"LIC  नवी पॉलिसी : एकाचवेळी भरा पुर्ण रक्कम अन् दर महिन्याला मिळवा २३ हजार रुपयांची पेन्शन!
"
कृषी वार्ताकृषी जागरण
"LIC नवी पॉलिसी : एकाचवेळी भरा पुर्ण रक्कम अन् दर महिन्याला मिळवा २३ हजार रुपयांची पेन्शन! "
"भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयीसीने देशातील नागरिकांची विश्वास जिंकला आहे. या विमा कंपनीला भारत सरकारचे नियंत्रण आहे. यामुळे आपला पैसा बुडण्याची भिती लोकांना नाही. दरम्यान सणासुदीच्या काळात एलआयसीने एक नवीन योजना आणली आहे. या योजनेचे सर्वात मोठे हे वैशिष्टये आहे, ज्यात आपण कोणत्याही पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतात.दरम्यान मागील काही दिवसांपासून एलआसीची जीवन अक्षय पॉलिसी (Jeevan Akshay Policy) ही खूप लोकप्रिय झाली आहे. आता परत ही पॉलिसी सुरू केली जात आहे. जीवन अक्षय पॉलिसी मध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्ये आहे की, एकाच वेळी यात गुंतणूक करावी लागते, त्यानंतर पॉलिसी धारक प्रत्येक महिन्याला सरकारकडून पेन्शन मिळू शकणार आहे. ही पेन्शन खात्यात आल्यानंतर प्रति महिन्याला पेन्शनची व्यवस्था करू शकतील.पेन्शनचा हप्ता भरल्यानंतर लागलीच खात्यात पैसे येणे सूरु होत असते.यामुळे ही पॉलिसी नागरिकांच्या पसंतीस उतरत असून लोक या पॉलिसीत अधिक गुंतवणूक करण्यास आपली पसंती दाखवत असतात. प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळत असल्याने लोकांच्या पसंतीच ही पॉलिसी उतरली आहे. एका सर्वेनुसार, या नोकरदार वर्ग या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक अधिक आहे. दरम्यान सिंगल प्रिमियम म्हणजेच एकाच वेळी हप्ता या पॉलिसीला द्यावा लागतो. याशिवाय ही एक नॉन लिंक्ड पॉलिसी आहे. याचाच अर्थ या पॉलिसीचा शेअर मार्केटशी कोणताच संबंध नाही.या पॉलिसीसाठी एक न्यूनतम एन्यूटी ची सुरुवात १२००० रुपये प्रति वर्षापासून सूरू आहे. पैसे गुंतवण्याची कोणतीच मर्यादा यात ठेवलेली नाही. जर तुम्ही ही पॉलिसी घेऊ इच्छूक आहात तर एक लाख रुपये जमा करुन तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकतात. संदर्भ - कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
133
17