AgroStar
LIC कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी!
नोकरीलोकमत न्युज १८
LIC कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी!
➡️ कोविडच्या (Covid-19) काळात सगळ्या देशातच आर्थिक मंदी आली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. चांगल्या चांगल्या कंपन्या बंद झाल्या. त्यामुळे सगळेच जण नोकरीच्या शोधात आहेत. अशा कठीण परिस्थितीत सरकारी नोकरीचं महत्त्व किती असतं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. त्यामुळे तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीमध्ये असोसिएट पदासाठी भरतीचं नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. एलआयसीच्या हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीत या जागा भरायच्या आहेत. अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट- lichousing.com ला भेट द्या. ➡️ एलआयसी असोसिएट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला वार्षिक 9 लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 मे 2021 ला सुरू झाली असून ती 7 जून 2021 पर्यंत सुरू असेल. या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर वर दिलेल्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन या पदासाठीचं नोटिफिकेशन संपूर्ण वाचा. माहिती करून घ्या आणि मग अर्ज करा. पात्रता ➡️ एलआयसीने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार असोसिएट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने कमीतकमी 55 टक्के गुणांनी रूरल मॅनेजमेंट विषयातील मास्टर डिग्री (Master in Rural Management) पूर्ण केलेली असावी. तसंच उमेदवाराचं वय 1 जानेवारी 2021 या दिवसापर्यंत 23 ते 30 वर्षांदरम्यान असावं. कसा कराल अर्ज? - सगळ्यात पहिल्यांदा ऑफिशियल वेबसाइटवर (Official Website) जा. - होम पेज वर Career सेक्शन वर क्लिक करा आणि त्यात Job Opportunities मध्ये जा. - आता CSR RECRUITMENT वर क्लिक करा. - त्यात To Apply Online Click Here वर क्लिक करा. - आता रजिस्ट्रेशन करून तुम्ही एलआयसी असोसिएट (LIC Associate) पदासाठी अर्ज भरू शकता. - तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट नक्की घेऊन ठेवा. निवड प्रक्रिया अशी असते ➡️ अर्ज केलेल्या सगळ्या उमेदवारांची ऑनलाइन टेस्ट घेतली जाईल. त्याच्या निकालाची मेरिट लिस्ट (Merit List) लागेल आणि त्यानंतर मुलाखत घेऊन निवड केली जाईल. नोटिफिकेशनमध्ये परीक्षेसंबंधी सगळी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे नोटिफिकेशनमध्ये दिलेली पात्रता तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही ही संधी पटकवू शकता. त्यामुळे अजिबात वेळ दवडू नका लगेच वेबसाइटला लॉग-इन करून या पदासाठी अर्ज भरून टाका. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत न्युज१८ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
13
इतर लेख