उत्पादन विकण्यासाठी ‘ई-नाम’वर करा रजिस्ट्रेशन
कृषी वार्तान्यूज18
उत्पादन विकण्यासाठी ‘ई-नाम’वर करा रजिस्ट्रेशन
नवी दिल्ली – शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेली ऑनलाइन बाजारपेठ ‘ई-नाम’च्या अंर्तगत रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेतकऱ्यांना आता उत्पादन विकण्यासाठी दलाल व आडतेंवर अवलंबून राहावे लागणार नाही. आतापर्यंत देशातील ५८५ बाजारपेठ ई-नाम अंतर्गत जोडल्या आहेत. केंद्रीय कृषी मंत्रालयच्या अंतर्गत काम करणारा ‘स्मॉल किसान अॅग्रीबिजनेस कन्सोर्टियम’ (एसएफएसी) भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत ई-नाम अंमलबजावणीसाठी प्रमुख एजन्सी आहे.
ई-नामवर या प्रकारे करा रजिस्ट्रेशन १. सर्वात पहिले आपल्याला ई-नामची ऑनलाइन वेबसाइट - www.enam.gov.in वर जावे लागेल. २. ही वेबसाइट इंग्रजी व हिंदी व्यतिरिक्त ७ प्रादेशिक भाषेतसोबतच एकूण ९ भाषेमध्ये उपलब्ध आहेत. या प्रादेशिक भाषेमध्ये मराठी भाषेचादेखील समावेश आहे. ३. येथे आपण रजिस्ट्रेशनसाठी आपली भाषा निवडावी व वेबसाइटच्या उजव्या बाजूला दिलेल्या रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. येथे क्लिक करताच एक नवे वेबपेज उघडेल. ४. या वेबपेजवर रजिस्ट्रेशन टाइप निवडा व येथे विचारण्यात आलेली माहिती म्हणजेच नाव, पत्ता, वैध ईमेल आईडी व अकांउट नंबर या सर्व गोष्टी रजिस्ट्रेशन करा. ५. ही सर्व महत्वपूर्ण माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करा व आपल्याला एक नोंदणीकृत लॉगिन आईडी हा आपण रजिस्ट्रेशन केलेल्या ईमेलवर पाठविला जाईल. ६. आता शेतकऱ्यांना ई-नाम वेबसाइटवर लॉगिन करून आपले केवायसी तपशील व कागदपत्रे दयावी लागेल. एपीएमसीने आपले केवायसी मंजूर करताच आपला व्यवसाय सुरू होईल. ७. अधिक माहितीसाठी https://enam.gov.in/web/resources/registration-guideline वर जावा व आपली भाषा निवडून याविषयी माहिती घ्या. संदर्भ – न्यूज 18, 5 ऑक्टोबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
197
1
इतर लेख