क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूग पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण!
• ही पाने खाणारी अळी अतिशय खादाड व अनेक पिकांवर आढळून येते. • पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत या किडीचा अधिक प्रादुर्भाव आढळतो. • विशेषतः खरीप हंगामात या किडीचा प्रादुर्भाव पाऊस सुरू असताना ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्रात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. • भुईमूगाची पाने मोठ्या प्रमाणावर कुरतडून खातात त्यामुळे पानावर मोठी भोके दिसतात. कांही अळ्या पानावर फक्त शिराच शिल्लक ठेवतात. • दुपारच्या वेळी हि अळी जमिनीलगत खोडाला इजा पोहचवते. • नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे स्थापित करावी. • अळीचा प्रादुर्भाव दिसताच नियंत्रणासाठी निम आधारित कीटकनाशक २० मिली (१% ईसी) किंवा ४० मिली (०.१५% ईसी) किंवा बेव्हेरिया बेसियाना हि बुरशी आधारित पावडर @४० ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिंजेनेसिस हि जिवाणूजन्य पावडर @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • तसेच अधिक प्रादुर्भाव असल्यास थायोमेथॉक्झाम १२.६% + लेम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @४ मिली किंवा मेथोमिल ४० एसपी @१२ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • जर आपल्या पिकामध्ये नागअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, डेल्टामेथ्रीन २.८ ईसी @१० मिली किंवा लेम्बडा सायहॅलोथ्रीन ५% ईसी @५ मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
संदर्भ : अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सीलेंस., ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेयर करा.
19
6
संबंधित लेख