AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटस्कायमेट
जाणून घ्या, सध्याची हवामानाची स्थिती!
दक्षिण भारत ते महाराष्ट्र याठिकाणी मान्सूनमध्ये थोडी स्थिरता आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील बर्‍याच भागात पाऊस कमी पडत आहे परंतु मध्य महाराष्ट्रामध्ये येत्या दोन दिवसात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच २३ आणि २४ जून रोजी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पांडिचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर कमी पाऊस पडल्याची शक्यता वर्तविली असून पुन्हा २५ जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. या खास हवामान व्हिडिओमध्ये स्कायमेटने महाराष्ट्राचा हवामान अंदाज कसा दर्शविला आहे ते जरूर पहा.
संदर्भ:- स्कायमेट हवामान पूर्णनुमान ची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
252
1
इतर लेख