क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
योजना व अनुदानकृषी जागरण
किसान विकास पत्र योजना: दुप्पट करा आपला पैसा; जाणून घ्या योजनेची माहिती!
जर तुम्हाला आपली रक्कम दुप्पट करायची असेल तर पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना ही सर्वोत्तम योजना आहे. केंद्र सरकारकडून ही योजना राबवली जाते. यामुळे या योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला निश्चितच चांगली रक्कम मिळते. या योजनेसाठी केंद्र सरकारनेच व्याजदर निश्चित केले आहे. इंडिया पोस्टच्या वेबसाईटनुसार या किसान विकास पत्र योजनेचा कालवधी आता १२४ महिन्यांचा करण्यात आला आहे. याचाच अर्थ १२४ महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील. या बदला आणखी एक बदल करण्यात आला असून हा या योजनेचे व्याजदर हे एक टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे.  किसान विकास पात्र पात्रता:- • अर्जदार एक प्रौढ असावा आणि तो भारतीय रहिवाशी असावा. • तो किसान विकास पत्र स्वत: च्या नावे किंवा अल्पवयीन वतीने अर्ज करू शकतो. • ट्रस्ट देखील या योजनेत गुंतवणूक करण्यास पात्र आहेत. एचयूएफ (हिंदू अविभाजित कुटुंब) आणि अनिवासी भारतीय केव्हीपीमध्ये गुंतवणूक करण्यास पात्र नाहीत.  किसान विकास पत्राचे फायदे:- • गुंतवणुकीची लवचिकता - केव्हीपी मध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त रक्कमही ठेवू शकता. कमीत कमी १०० रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. जास्तीत जास्त आपण ५० हजार रुपयांची गुंतवणूक करु शकता. • परताव्याची हमी - ही योजना केंद्र सरकारच्या मार्फत राबवली जाते. यामुळे परताव्याची हमी आपल्याला मिळत असते. या योजनेत गुंतवणूक करण्यात कोणत्याच प्रकारचा धोका नाही.  कसा अर्ज कराल:- • अर्ज करण्यासाठी दोन प्रकारच्या पद्धती आहेत, तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईनही करु शकतात. • यासाठी आपल्या पोस्ट ऑफिसमधून केव्हीपी अर्ज फॉर्म किंवा फॉर्म-ए घ्यावा लागेल. • सर्व संबंधित तपशील भरा आणि पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करा. • जर एजंटमार्फत गुंतवणूक केली गेली असेल तर दुसरा फॉर्म भरावा आणि सबमिट करावा लागेल. • दोन्ही प्रकारचे अर्ज फार्म हे https://www.indiapost.gov.in/. या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. • केवायसी प्रक्रियेसाठी आपल्याला आपल्या ओळखीच्या पुराव्यांची एक प्रत द्यावी लागेल. आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / पासपोर्ट / मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड.
संदर्भ:- कृषी जागरण हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
203
11
संबंधित लेख