क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताकृषी जागरण
शेतकरी क्रेडिट कार्ड मिळविण्याचा सोपा मार्ग
‘शेतकरी क्रेडिट कार्ड’ तयार करण्यासाठी फक्त तीन गोष्टींची गरज लागणार आहे. ‘शेतकरी क्रेडिट कार्ड’ (केसीसी) साठी आता, फक्त तीन कागदपत्रे घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिली. शेखावत म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यासाठी अर्ज केला आहे, मात्र तो शेतकरी आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी बॅक शेतीचे कागदपत्रे पाहतील व त्याची प्रत घेतली जाईल. दुसरे, घऱाचे कागदपत्रे आणि तिसरे म्हणजे अर्जदार शेतकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र. या प्रतिज्ञानपत्रात शेतकऱ्यांने कोणत्याही बॅकेमध्ये कर्ज घेतले आहे की नाही याविषयी जाणून घेतले जाईल. त्याचबरोबर सरकारने बँकिंग असोसिएशनला केसीसी अनुप्रयोगासाठी कोणतेही शुल्क न घेण्यास सांगितले आहे. शेतकऱ्याजवळ लागवडीसाठी जमीन असल्यास, जमीन गहाण न ठेवता तो कर्ज १ लाख रू. पर्यंत कर्ज घेवू शकतो. जर १ लाखापेक्षा जास्त कर्ज पाहिजे असेल, तर साक्षीदार असणे आवश्यक आहे.
शेतकरी क्रेडिट कार्ड फक्त ५० टक्के शेतक-यांपर्यंत मर्यादित आहे. देशात १४ करोड शेतकरी कुटुंब आहेत, यामध्ये फक्त ७ करोड शेतकऱ्यांजवळच किसान क्रेडिट कार्ड आहे. कारण हे कार्ड तयार करण्याची प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे. संदर्भ – कृषी जागरण, ६ मार्च २०१९ _x005F_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
188
0
संबंधित लेख