क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताकृषी जागरण
नवीन नियमांनुसार किसान क्रेडिट कार्डचा लाभ कोणाला मिळणार? जाणून घ्या!
किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) नवीन नियमांतर्गत केसीसीचा लाभ कोणाला मिळणार हे आपल्याला पुढील माहितीवरून समजेल  सरकारने किसान क्रेडिट कार्ड का सुरू केले? शेतकऱ्यांना कमी व्याजदराची कर्जे देण्यासाठी केंद्र सरकारने १९९८ मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली होती. शेतकर्‍यांना बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देण्यासाठी ही किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे.  केसीसीमार्फत ३ लाख रु. पर्यंत कर्ज मिळवा. या केसीसी योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आपले किसान क्रेडिट कार्ड बनविले आहे त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. शेतकरी या कर्जाची रक्कम कृषी यंत्रणा, बियाणे, खते आणि कीटकनाशके विकत घेण्यासाठी वापरु शकतात! तसेच शेतकरी हे क्रेडिट कार्ड ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी देखील वापरु शकतात!  २.५ कोटी शेतकऱ्यांनी २ लाख कोटी रुपयांचे सवलतीचे कर्ज- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी जाहीर केले की, बँकांनी खरीप पेरणी व त्यासंबंधित कामांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी सुमारे १.१ केसीसी धारकांना ८९,८१० कोटी रुपये मंजूर केले आहेत.  किसान क्रेडिट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे • शेतकर्‍यांचे आधार कार्ड • ओळखपत्र • जमीन पावती/ उतारा • पासपोर्ट आकाराचा फोटो • मोबाइल नंबर • बँक पासबुकची छायाप्रत केसीसी ऑफलाइन कसे करायचे? • वरील कागदपत्रे घेतल्यानंतर आपण आपल्या जवळच्या बँकेत संपर्क साधू शकता. तसेच खालील कागदपत्रे बँकेत असलेल्या अर्जासह संलग्न करुन ती संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा. किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळणार? • या पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत केवळ शेतकरीच आपले किसान क्रेडिट कार्ड बनवू शकतात. ही किसान क्रेडिट कार्ड योजना फक्त बँकाच बनवू शकतील. • आपणास आपले किसान क्रेडिट कार्ड देखील मिळवायचे असेल तर शक्य तितक्या लवकर आपल्या जवळच्या बँकेशी संपर्क साधा. त्याच बँकेकडून केसीसीसाठी अर्ज भरल्यानंतर संबंधित सर्व माहिती भरून त्याच बँकेत संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा. संदर्भ - १७ ऑगस्ट २०२०, कृषी जागरण., यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
119
13
संबंधित लेख