क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताकृषी जागरण
शेतकऱ्यांनो ! सिंचन संच खराब झाल्यास होईल मोफत दुरुस्ती.
"सध्या शेतीचा खरीब हंगाम सुरु आहे. शेतकऱ्यांना उधारीवर खते किंवा विविध कामे करावी लागतता. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने शेतकऱ्यांना सिंचन संचाची दुरुस्ती करण्यास अडचणी येतात. यामुळे सिंचन संच स्वत जवळ असतानाही शेतीसाठी उपयोग करता येत नसल्याने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत संचाची दुरुस्ती शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. केंद्र सरकारने ठिंबक सिंचन योजना राबविण्या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या अंतर्गत सूक्ष्म सिंचन संच उत्पादक व संबंधित कंपनीचे पुरवठादार विक्री करीत असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात विक्रीपश्चात सेवा शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र उघडून देणे आवश्यक आहे. पुरवठा केलेल्या संचासाठी संबंघित शेतकऱ्याला ३ वर्षापर्यत मोफत सर्व्हिसिंग सेवा देणे आवश्यक आहे. सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या सुचनेनुसार बदलावयाच्या साहित्याची किंमत आकारुन तो पार्ट बदलून देणे आवश्यक आहे. सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कंपनीला ही सेवा देणे बंधनकारक केले आहे. या पंधरावड्यात शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन सेवा उपलब्ध करुन देण्याबरोबर सूक्ष्म सिंचनासह तांत्रिक माहिती देणे त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. कौशल्याधारिक कामे करणाऱ्या शेतमजुरांसाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येते आहे. संदर्भ - २० ऑगस्ट २०२० कृषि जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. "
94
6
संबंधित लेख