गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळवर्गीय पिकांमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन
डाळवर्गीय पिकांमध्ये शेंगा पोखरणारी अळी जास्त प्रादुर्भाव निर्माण करते. उदा.(चवळी, मुग, उडीद) रोपांची मोठी पाने व हवामानाची स्थिती यामुळे मारुका प्रजातीच्या संख्या जास्त वाढते. यांचा प्रसार पिकांच्या फुलधारणेच्या अवस्थेत जास्त प्रमाणात होतो. ही अळी विकसित झालेल्या शेंगामधील आतील भाग खाऊन पिकांना नुकसान पोहचवते.
एकात्मिक व्यवस्थापन –
• प्राथमिक अवस्थेत निमार्क ५% किंवा निमतेल @४० मिली प्रति पंप फवारणी करावी.
• ट्रायझोफॉस ४०%+सायपरमेथ्रीन ४% ईसी@ १० मिली किंवा लुफेन्युरॉन ५.४ % ईसी@ १० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्लू पी @ १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.
• चवळी,उडीद पिकांसाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्लू जी @५ ग्रॅम किंवा फ्लुबेनडामाईड ३९.३५%एस सी @३ मिली किंवा क्लोरॅनट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @ ३ मिली प्रति १० लि. पाण्यात फवारणी करावी.
• तुरीसाठी इंडोक्झाकार्ब १४.५ एस सी @३.५ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ डब्लू जी @ ५ ग्रॅम प्रति १० लि. पाण्यात ५० टक्के फुलधारणा झाल्यावर फवारणी करावी व दुसरी ७ दिवसानंतर फवारणी करावी.
• मुग पिकासाठी क्लोरॅनट्रिनीलीप्रोल १८.५ एस सी @ ३ मिली किंवा फ्लुबेनडामाईड ३९.३५%एस सी @३ मिली प्रति १० लिटर पाण्यात ५०% फुलधारणा झाल्यावर फवारणी करावी.
• प्रत्येक फवारणी वेळी कीटकनाशक बदलून वापरावे.
• या किडींचे नैसर्गिकरित्या परजीवी किडीमार्फत नियंत्रण करण्यासाठी बॅसस रिलेटवस यांचे संवर्धन करावे
डॉ. टी.एम. भरपोडा,
माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र,
बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!