AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन
सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो. यामध्ये पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी, तंबाखूची पाने खाणारी अळी-स्पोडोप्टेरा लिट्युरा, चक्री भुंगेरे इत्यादी प्रामुख्याने सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. सर्व समावेशक कीड नियंत्रण प्रणाली म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीचा वापर केल्यास कमी खर्चात, कीड नियंत्रण होऊ शकते. • ऊन्हाळ्यात शेतीची खोल नांगरट केल्याने जमिनीतील किडींच्या सुप्त अवस्थांचा, कोषांवस्थेचा नाश होतो. त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांच्या बुरशीचा, बिजाणूंचादेखील नाश होतो. • सोयाबीन पेरणी करताना एकरी १००-२०० ग्रॅम ज्वारी पेरावी त्यामुळे नैसर्गिक पक्षी थांबे शेतीमध्येच तयार होतील. • सोयाबीन पिकाला नत्र युक्त खतांचा संतुलित वापर करावा. सोयाबीन पीक द्वीदलवर्गीय असल्याने नत्रखताची अल्प आवश्यकता असते. • शेतीच्या सभोवताली एरंडी पिकाच्या ओळी सापळा पीक म्हणेन लावाव्यात यामुळे स्पोडोप्टेराच्या अळीच्या नियंत्रणास मदत होइल. • सोयाबीन पीक उगविल्यानंतर १० -१५ दिवसात कामगंध (फ़ेरोमोन) सापळ्याचे नियोजन एकरी ४ या प्रमाणात स्पोडोल्युर सह करावे. • सापळ्यात प्रौढ पतंग अडकताना दिसू लागताच ५% निंबोळी अर्काची फ़वारणी सोयाबीन पिकात घ्यावी. आवश्यकता पडल्यास पुन्हा १० दिवसांच्या अंतराने पुन्हा एक फ़वारणी घ्यावी. • सोयाबीनच्या पेरणीनंतर २०-२५ दिवसांत "T" आकाराचे काठीचे पक्षीथांबे एकरी २५-३० या प्रमाणात उभे करावेत. यामुळे पक्ष्यांना शेतीमध्ये बसून किडींचे नैसर्गिक पध्दतीने नियंत्रण करतात. • सोयाबीन वरिल विविध अळ्यांच्या जैविक नियंत्रणासाठी कीटकपरोपजीवी बुरशींपासून तयार केलेल्या कीडनाशकांची जसे बिव्हेरीया बॅसियाना किंवा न्युमोरीया रिले यांची फ़वारणी घ्यावी. संदर्भ - श्री.तुषार उगले,कीटकशास्त्रज्ञ
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
325
2