AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांग्यामधील शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वांग्यामधील शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन
• कीडग्रस्त शेंडे व फळे आढळून आल्यास काढून नष्ट करावीत. • पीक फुलोऱ्यावर यायच्या अगोदर एकरी ४ ते ६ कामगंध (ओटा) सापळे लावावेत. सापळे शेतात पिकाच्या उंचीच्या वर लावावेत. यातील कामगंधाकडे किडीचे नर पतंग आकर्षित होऊन अडकतात. त्यांचे मिलन होत नाही. परिणामी पुढील पिढी निर्माण होण्यात अडथळे येतात. • प्रकाश सापळा प्रती एकर क्षेत्रात एक लावावा.
• जैविक कीड नियंत्रणासाठी, ट्रायकोग्रामा चिलोनीस प्रजातीचे ट्रायकोकार्ड 2-3 प्रती एकर लावावेत. • बी. टी. जिवाणूवर आधारित कीटकनाशक १० ग्रॅम प्रती लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. • निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझाडीरेक्टीन (१५०० पीपीएम) ३ मि.ली. प्रती लिटर पाणी लागवडीनंतर १५ दिवसांनी फवारणी करावी. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
931
6
इतर लेख