AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मोहरीवरील कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मोहरीवरील कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन
कॅनडा जगातील सर्वांत मोठा मोहरी उत्पादक देश आहे. भारतात, उत्तर प्रदेश मोहरीच्या उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि नंतर राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो. मोहरीच्या पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मोहरीवर कीटकांचा जास्त प्रादुर्भाव होत असल्याने जास्तीत जास्त काळजी घ्यावी. या अळीलाला थोडासा स्पर्श करताच ती मेल्याप्रमाणे वागते आणि मातीवर पडते रोपे १५ ते २० दिवसांची असताना या अळ्या रोपांवर गोल छिद्रे पाडतात आणि पाने खातात. पानांच्या खालच्या पृष्ठभागावर एकापेक्षा जास्त अळ्या दिसून येतात. उपद्रव जास्त प्रमाणात असल्यास, अळ्या लहान रोपांची सर्व पाने पाडतात आणि पुन:पेरणीची परिस्थिती उद्भवू शकते.
एकत्रित व्यवस्थापन : • सुरुवातीस अळ्या हाताने उचलणे आणि केरोसीनमध्ये त्यांचा नाश करणे. • अळ्यांची संख्या प्रति चौरस फूटांपर्यंत सुमारे २ आढळल्यास, १० लिटर पाण्यात निम तेल ५० मि.ली. किंवा नीम आधारित फॉर्म्युलेशन २० (१ % ईसी) ते ४० (०.१५ % ईसी) मिली. घेऊन फवारावे. • जैविककीटकनाशकांचे फायदे मिळवण्यासाठी, १० लिटर पाण्यातून बॉव्हेरीयाबास्सीयाना ४० ग्रॅम घेऊन फवारा. • ही फवारणी असूनही, संख्या नियंत्रणाखाली नसल्यास, क्लिनालफॉस २५ ईसी २० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यूजी ३ ग्रॅम १० लिटर पाण्यात घेऊन फवारावे. • क्विनॉलफॉस १.५ % किंवा क्लोरपायरिफॉस २ % प्रति २० – २५ किलो प्रति हेक्टर सारख्या डस्ट फॉर्म्युलेशनचा ( धूळ स्वरूपाचा ) वापर सुद्धा करू शकता. नैसर्गिक शत्रू आणि वातावरणावरील प्रतिकूल परिणामांकडे पाहून अशा डस्ट फॉर्म्युलेशनचा ( धूळ स्वरूपाचा ) वापर करणे ईष्ट नाही. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
255
1