AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
संत्रा बागेतील रसशोषक पतंगाचे एकात्मिक व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
संत्रा बागेतील रसशोषक पतंगाचे एकात्मिक व्यवस्थापन
सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात फळांची सर्वाधिक गळ होताना दिसते. रस शोषक पतंगाचा वाढता प्रादुर्भाव हेच या फळ गळतीचे महत्त्वाचे कारण असते. साधारणतः सरासरी फळगळीपैकी १०-१५ टक्के गळ या रसशोषक पतंगाच्या प्रादुर्भावामुळे होते. 1. प्रकाश सापळ्यांचा वापर - फळ पक्वतेच्या काळात बागेच्या चारही कोपऱ्यामध्ये व मध्यभागी प्रकाश सापळे लावावेत. त्यासाठी एक मर्क्युरी दिवे लावून, त्याखाली पसरट भांड्यामध्ये केरोसिनयुक्त पाणी ठेवावे. हे दिवे रात्री १० ते ११ या वेळेत सुरू ठेवावेत. 2. संत्रा बागेच्या बांधावरील तणांचा नायनाट करावा. 3. पक्वतेच्या वेळी शक्‍य असल्यास फळे कागदाने झाकून घ्यावेत. 4. १०-१५ दिवसाच्या अंतराने फळतोडणी होईपर्यंत निंबोळी तेल (निमऑईल) ५० मि.लि. प्रतिपंप या प्रमाणे फवारणी करावी.
5. सायंकाळीच्या वेळी बागेच्या बांधावर गवत पेटवून धूर करावा. 6. वरील प्रतिबंधात्मक फवारणी करूनही पतंगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास,शिफारशीत रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा. अॅग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
170
3