AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मोहरीमध्ये माव्याचे व्यवस्थापन
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मोहरीमध्ये माव्याचे व्यवस्थापन
मावाचा प्रादुर्भाव मुख्यत: नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये होतो. या प्रादुभार्वामुळे पाने हळूहळू पिवळी होतात आणि खाली पडतात. तसेच यावेळी फुले आणि पानाची शेंडेदेखील वाळतात. त्याचचबरोबर माव्यामधून काळा काजळीसारखा द्रव स्त्रावतो. यामुळे हे पीक काळे पडून प्रकाश संश्लेषणाला अडथळा निर्माण करतात. यामुळे या पिकांचे उत्पादन, गुणवत्ता आणि बियाण्यातील तेलाचे प्रमाण कमी होते. एकात्मिक व्यवस्थापनः • शिफारसनुसार नत्रयुक्त खत आणि सिंचनाचा वापर करा. • पिवळे सापळे लावा. • किडींच्या प्राथमिक अवस्थेत निम आधारित घटक असलेल्या कीटकनाशकाचा वापर@१० मिली(१% इसी) ते ४० मिली (०.१५% इसी) किवा व्हर्टीसिलीयम लेकानी पावडर @ ४० ग्रॅम प्रति १० ली पाण्यात सांयकाळच्या वेळेस फवारणी करावी. • जर माव्याचा प्रादुर्भाव जास्त असेल, तर इमीडाक्लोप्रीड ७० डब्लूजी @ २ ग्रॅम किवा थायोमीथॉक्झम २५ ग्रॅम डब्लूजी @ ४ ग्रॅम किवा सायपरमेथ्रीन ४०% +प्रोफेनोफॉस ४% इसी @ १० मिली किवा असीफेट ७५ डब्यूपी @ १० ग्रॅम किवा इमीडाक्लोप्रीड १७.८ एसएल @ ५ मिली प्रती १० ली पाण्यात फवारणी करावी.
• मधमाशींचे प्रमाण सकाळच्या वेळी जास्त असते, त्यामुळे शक्यतो संध्याकाळी कीटकनाशकाची फवारणी करा. • ज्या भागात परभक्षी कीटक मोठया प्रमाणात असेल, तर कीटननाशक स्प्रे टाळा. डॉ. टी.एम. भरपोडा, _x000D_ माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र,_x000D_ बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
124
1