कृषि वार्ताअॅग्रोवन
डाळिंब लागवडी विषयी माहिती
डाळिंब लागवडीसाठी हलकी ते मध्यम चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी लागवडीसाठी भगवा ,सुपरभगवा ,गणेश,आरक्ता,मृदुला या जाती निवडाव्या सरकार मान्य रोपवाटिका किंवा खात्री असलेल्या रोपवाटिकेतुनच कलमे खरेदी करावी .माती परीक्षण अहवालानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी.
पाणी व्यवस्थापनासाठी ठिबकसिंचन करावे .लागवडीचे अंतर ४.५*३ मीटर ठेवावे.लागवडीसाठी खड्ड्याचा आकार ६०*६०*६० सेंटीमीटर असावा खड्ड्याच्या चोहोबाजूंनी कार्बेन्डेझिम चे ०.१ % तीव्रतेचे ४ ते ५ लिटर द्रावण ओतून खड्डे निर्जंतुक करावे त्यामध्ये २ भाग माती १ भाग सेंद्रिय खत व त्यामध्ये १ किलो निंबोळी पेंड व माती परीक्षण अहवालानुसार रासायनिक खतमात्रा,२५ ग्राम कार्बोफ्युरान या मिश्रणाने भरावे व पाणी द्यावे .लागवडीनंतर सुरवातीची दोन वर्षे दोन ओळींमध्ये कांदा,मुग,चवळी यासारखी कमी उंचीची आंतरपिके घ्यावीत डाळिंब बागेत काकडीवर्गीय आणि वांगेवर्गीय पिकांची लागवड करू नये.लागवडीविषयी तांत्रिक माहितीसाठी जवळच्या फळ संशोधन केंद्र येथे संपर्क साधावा.
संदर्भ – अग्रोवन ३० ऑगस्ट १७