गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसाच्या विविध जातींची माहिती
१) को ८६०३२ - हि जात आडसाली लागवडीसाठी चांगली असून सरासरी एकरी ६३.४१ टन उत्पादन मिळते. साखर उताराही चांगला आहे. ही जात मध्यम उशिरा परीपक्व होणारी असून थोड्या प्रमाणात उशिरा तुरा येतो. चांगला फुटवा काणी व गवताळ वाढ रोगास मध्यम प्रतिकारक.पाण्याचा ताण सहन करणारी जात आहे.ह्या जातीचा खोडवा चांगला येतो या जातीस खतमात्रा शिफारशी पेक्षा २५% वाढवून द्यावी.
२) को २६५ - हि जात को ८६०३२ ह्या जातीपेक्षा २० ते २५ टक्के जास्त उत्पादन देते ऊसाची व कांडीची लांबी जादा आहे. क्षारयुक्त चोपण जमिनीत हि इतर जातींपेक्षा चांगली येते खोडव्यास चांगली आहे.
सर्व फुटव्यांची वाढ एकसारखी होते.साखर उतारा को ८६०३२ जातीच्या तुलनेत कमी आहे.
३) को .व्ही एस आय ९८०५ - को ८६०३२ ह्या जाती पेक्षा २२ टक्के उत्पादन जास्त येते.को ८६०३२जातीपेक्षा रिकवरी जास्त आहे. हि जात उथळ मध्यम खोल व निचऱ्याच्या जमिनीत चांगली येते. खोडवा चांगला येतो ऊस जड असल्यामुळे ऊस अजिबात लोळत नाही.तोडणी यंत्राच्या सहायाने ऊस तोडणी करण्यास उपयुक्त आहे.हि जात ठिबक सिंचनासाठी अतिशय उपयुक्त आहे.या जातीस तुरे येत नाही.
गुणदोष -
१) फुटव्याचे प्रमाण कमी आहे.
२) पावसाळ्यात पोक्काबोंग नावाचा रोग येतो.
३) जानेवारी फेब्रुवारी महिन्यात खोडकीडीस बळी पडते.
४) १०००१ - १०००१ ह्या ऊसाच्याजातीची लागवड अडसालीसाठी करू नये. पूर्व हंगाम व सुरु हंगामासाठी चांगली आहे.कमी कालावधी मध्ये साखर उतारा चांगला येतो.पाणी कमी लागते.
५) ८००५ - ८००५ ह्या ऊसाच्याजातीची लागवड अडसालीसाठी करू नये. पूर्व हंगाम व सुरु हंगामासाठी चांगली आहे.कमी कालावधी मध्ये साखर उतारा चांगला येतो.पाणी कमी लागते.
श्री. सुभाष मोरे
जेष्ठ कृषी तज्ञ (ऊस)