क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
भारतातून साखर आयात करणार इंडोनेशिया व मलेशिया!
साखरचे मोठया प्रमाणातील उत्पादन व शेतकऱ्यांजवळ शिल्लक असलेल्या साखरेवर उपाय म्हणून केंद्र शासन साखर निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. या संबंधित इंडोनेशिया व मलेशियाने भारतातून साखर आयात करण्यात रूची दाखविली आहे, मात्र त्यासोबतच पॉम तेलच्या आयाती शुल्कात घट करण्याची अटदेखील घातली आहे. इंडोनेशिया आणि मलेशिया यांनी जवळजवळ ११ ते १३ लाख टन साखर आयात करू शकतात, मात्र पॉम तेल आयात शुल्कात कमी करण्याच्या विषयावर खादय मंत्रालय व वाणिज्य मंत्रालय चर्चा करत आहे. चालू पेरणी हंगामात आतापर्यत केवळ ६.५ लाख टन साखर निर्यातीच्या अटीवर काही व्यवहार झाले आहेत. जेणेकरून केंद्र सरकारने ५० लाख टन निर्यातची परवानगी दिली आहे.
केंद्र सरकार चीन, बांग्लादेश, श्रीलंका, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये साखर निर्यातीसाठी काही टीम पाठविले होते. मात्र यामध्ये पहिलेदेखील चीन या देशाने भारतातून साखर आयात केली होती. बांग्लादेश आणि श्रीलंका हे देशदेखील साखर आयात करत आहे. इंडियन शुगर मिल्स एसोसिएशन (इस्मा) च्या अनुसार चालू पेरणी हंगाम २०१८-१९ मध्ये साखरेचे एकूण उत्पादन ३२० लाख टन होण्याचे अंदाज आहे. शिल्लक साठयामध्ये साखर एकूण ४२७ लाख टन उपलब्ध आहे. या सर्वामध्ये घरेलू बाजारात साखर मोठया प्रमाणात उपलब्ध आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १८ जानेवारी २०१९
2
0
संबंधित लेख