क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताअॅग्रोवन
रशियामध्ये द्राक्षेची निर्यात संथ गतीने
नाशिक : भारतीय द्राक्षाचा रशिया मोठा आयातदार आहे. मागील वर्षी निर्यातीत १८.१९ टक्के वाढ होऊन एकूण निर्यातीच्या १५ टक्के निर्यात रशियात झाली होती. परंतु या वर्षी रशियन वनस्पती संगरोध विभाग (प्लांट कोरंटाईन बोर्ड)ने निर्यातदारांना कुठलीही पूर्वसूचना न देता तांत्रिक कारणे पुढे करत कामकाज संथ केले आहे. “महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे खजिनदार कैलास भोसले सांगतात, रशियामध्ये द्राक्षासाठी मोठी मागणी आहे. मात्र सध्या पेस्ट फ्री एरिया सर्टिफिकेटची मागणी कस्टम विभागाकडून होत आहे. यामुळे द्राक्ष बागायतदार संघाने लक्ष घातले आहे. जर याची पूर्तता झाली तर द्राक्ष निर्यात पहिल्यासारखी सुरळीत होईल.”
रशियन कस्टम विभागाकडून पेस्ट फ्री एरिया सर्टिफिकेटची मागणी होत असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या अपेडा, कृषी विभाग यांनी यात लक्ष घालायची गरज आहे. याउलट दक्षिण आफ्रिकेमध्ये कंटेनर्स दोन ते तीन दिवसांत क्लिअर होत आहेत. भारतीय वाणिज्य मंत्रालयाने रशिया सरकारशी बोलून यात तडजोड करणे गरजेचे आहे. संदर्भ – अॅग्रोवन, २२ फेब्रुवारी २०१९
76
0
संबंधित लेख