AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कोरोनामुळे भारताकडे वाढली हळदीची मागणी
कृषी वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
कोरोनामुळे भारताकडे वाढली हळदीची मागणी
युरोप आणि पश्चिम आशियाई देश भारताकडे मोठया प्रमाणात हळदीची मागणी करत आहेत. यामुळे हळदीच्या निर्यातीत जोरदार वाढ झाली आहे. कोरोना विषाणूमुळे भारतीय हळदीच्या औषधी गुणधर्मांकडे लोकांचे लक्ष वेधले आहे. हळदी सहसा गरम दुधामध्ये मिसळून प्यायले जाते. असा विश्वास आहे की, यामुळे श्वसन प्रणाली निरोगी राहते. केबी एक्स्पोर्टचे सीईओ कौशल खाखर म्हणाले की, फळ आणि भाज्यांच्या एकूण मागणीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण, कच्च्या हळदीच्या मागणीत 300% वाढ झाली आहे. कौशल म्हणाले की, ब्रिटन आणि जर्मनीमधून हळदीची मागणी वेगाने वाढत आहे. मुंबईवरून भाजीपाला व फळांची निर्यात करणारे राजीव गुप्ता म्हणाले की, नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान हळदीची कापणी केली जाते. या दरम्यान 3 ते 4 टन हळद निर्यात करतो. फेब्रुवारीमध्ये उन्हाळ्याच्या सुरूवातीस, मागणी सहसा कमी होऊ लागते. मात्र, गेल्या 10 दिवसांपासून हळदीची मागणी अचानक वाढली आहे. फेब्रुवारी अखेरपासून सुमारे 300 किलो हळदीची निर्यात करत आहोत. त्याच वेळी, मागणी मार्चपासून दररोज 3 टनवर पोहोचली आहे. संदर्भ - इकॉनॉमिक टाइम्स, 17 मार्च 2020 या उपयुक्त माहितीसाठी लाइक करा व शेअर करा
30
0
इतर लेख