क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताकृषी जागरण
कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर - उपराष्ट्रपती
मुंबई: आजही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार आहे. सुमारे ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असल्याने देशात येणारी गुंतवणूक आणि उद्योगांचा मुख्य भर हा कृषी क्षेत्रावर असणे आवश्यक आहे. यामुळे शाश्वत शेती व सुनिश्चित रोजगार यासाठी आश्वासक पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मुंबई येथे सी.आय.आय. या औद्योगिक संस्थेच्या शिखर संस्थेची २५ वी वार्षिक भागीदारी परिषद (सीआयआय पार्टनरशिप समिट-२०१९) ‘न्यु इंडिया रायजिंग ग्लोबल ओकेशन्स’ च्या उद्घाटनप्रसंगी मांडले. नायडू म्हणाले, कृषी क्षेत्राला फायदेशीर आणि टिकाऊ बनविणे आवश्यक आहे. यासाठी कुक्कुट, बागकाम आणि मासेमारीसारख्या पूरक व्यवसायांना ही प्रोत्साहन दिले पाहिजे. कृषी सह कृषीमालाचे मुल्यवर्धन आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देणे आवश्यक आहे. याशिवाय संशोधनावर लक्ष केंद्रीत करून देशातील सुरक्षित अन्न उत्पादन वाढविणे गरजेचे आहे, तसेच गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्था सुदृढ होत आहे.
जागतिक स्तरावर मंदीचे वातावरण असतानाही भारतात लागू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांसाठीच्या धोरणांमुळे भारत गुंतवणुकीसाठी सगळ्या जगाचे आकर्षण केंद्र बनले आहे यास उद्योग संस्थांच्या प्रतिसाद मिळाल्याने अर्थव्यवस्थेला स्थिरता आली आहे. सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्थेमध्ये भारत देशदेखील आहे. ३ ट्रिलीयन डॉलर इकोनॉमी पर्यंतचा पल्ला देशाने गाठला आहे, येत्या काही वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. जागतिक बँकेने दिलेल्या अंदाजानुसार भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहील. संदर्भ - कृषी जागरण, १४ जानेवारी २०१९
60
0
संबंधित लेख