AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फॉस्फेटिक, पोटॅश खतांसाठी २२ हजार कोटींचे अनुदान
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
फॉस्फेटिक, पोटॅश खतांसाठी २२ हजार कोटींचे अनुदान
नवी दिल्ली: शेतकऱ्यांना आता रास्त व किफायतशीर दरात खते उपलब्ध होणार आहेत. फॉस्फेटिक व पोटॅश खतांवर २२ हजार कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेतला. माहिती व नभोवणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. फॉस्फेटिक व पोटॅश खतांवर २२ हजार ८७५ कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. अनुदान दर पुढीलप्रमाणे (रूपये/प्रति किलो) नत्र – १८.९०१ स्फुरद – १५.२१६ पालाश – ११. १२४ गंधक – ३.५६२ संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १ ऑगस्ट २०१९
33
1
इतर लेख