AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या कापूस हंगामासाठी महत्वपूर्ण कापूस लागवडीचे तंत्र
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
या कापूस हंगामासाठी महत्वपूर्ण कापूस लागवडीचे तंत्र
या हंगामात महाराष्ट्रातील बहुतांशी भाग कापूस लागवडीसाठी सज्ज झालेला असून, त्यासाठी योग्य व्यवस्थापन व लागवडीचे अत्याधुनिक तंत्र याविषयी जाणून घेणे क्रमप्राप्त आहे.
मशागत- जमीन मशागत हा एक महत्वाचा आणि प्राथमिक टप्पा असून, यामध्ये मे महिन्यात नांगरणी करून शेत-जमीन तापवून घ्यावी. ज्याद्वारे कीड आणि रोगांचे बीज उदा. बोंड अळीची अंडी, रस सोषक किडींचे अवशेष, मुळकुज व मर रोगाचे बुरशीचे बीज-पुष्प उन्हामुळे नष्ट होतील आणि पुढील हंगामात यांचा प्रादुर्भाव होणार नाही. नांगरणी खोल करून निदान १५ दिवस जमीन तापल्यानंतरच पुढील कामे म्हणजेच आडवी उभी फणणी किंवा वखरणी करावी. फणणी करताना ढेकळे फुटून जर माती मोकळी झाली नसेल, तर रोटावेटर फिरवून शेत तयार करावे. शेणखत अथवा सेंद्रिय खत निसळून कापूस एक पीक लागवड असेल, तर सरी वरंभा तयार करावा. आंतरपीक काही घ्यावयाचे असल्यास सपाट वाफे पाडावेत. लागवड- कमी पावसाच्या भागामध्ये सरी वरंभे पाडून लागवड करावी. यासाठी अंतर कमी दिवसाच्या वाणांसाठी ओळींमधील अंतर ३ फुट आणि बियांमध्ये ०.५ ते १ फुट असावे मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या वाणांसाठी ओळींमध्ये ४ फुट आणि बियांमध्ये १ ते २ फुट असावे. उशिरा पक्व होणाऱ्या वाणांसाठी अंतर दोन ओळीमध्ये ५ फुट आणि बियांमध्ये २ फुट असणे फायद्याचे राहील. जमिनीचा पोत आणि सुपीकतानुसार अंतर आपण कमी जास्त करू शकतो. कापूस बी अंदाजे ५ सेंटी खोलीवर टोबून लावावे त्यापेक्षा जास्त खोल लागवड होणार नाही याची दक्षता घ्यावी. लागवडीपासून पहिले पाणी दिल्यानंतर ५-६दिवसात बीज उगवून आलेले दिसते. अन्नद्रव्ये व्यवस्थापन- लाल्या रोग प्रादुर्भाव होऊ नये यासाठी म्हणून मशागत करतेवेळी शेणखत अथवा सेंद्रिय खत वापरावे. त्याचबरोबर शाश्वत पाणी उपलब्ध असल्यास, नत्र, स्पुरद, पालाश आणि मॅग्नेशियम खतांची पहिली मात्रा द्यावी. यासाठी १०:२६:२६ (१ बॅग) आणि युरिया (२५ किलो) एकत्रित किंवा १८:४६ (१ बॅग) आणि पोटॅश (१ बॅग) एकत्रित वापरावे. तण नियंत्रण- ताणांना प्रतिबंध म्हणून कापूस बी लावल्यानंतर पहिल्या पाण्यासोबत पेंडीमीथालीन ७०० मिली १५० ते २०० लिटर पाण्यात मिसळून एक एकर क्षेत्रावर फवारणी करावे. या फवारणीमुळे तण उगवून येत नाही. फक्त फवारणी करताना उलट दिशेने चालावे, जेणेकरून पायाचे ठसे उमटणार नाही. पहिल्या पाण्यानंतर २४ तासाच्या आतमध्ये याची फवारणी घेणे बंधनकारक आहे. कापूस शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी १८०० १२० ३२३२ नंबरवर मिस कॉल द्या.
274
0