क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शेतकऱ्यांना मिळणार तालुकानिहाय हवामान अंदाज
दिल्ली : देशातील सुमारे साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना वेगाने बदलत्या स्थानिक हवामानाची अचूक माहिती मिळावी, यासाठी पुढील वर्षापासून (२०२०) देशातील ६६० जिल्ह्यांमधील ६ हजार ५०० तालुक्यांसाठी हवामान अंदाज देणार आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) स्पष्ट केले आहे. हवामान अंदाजातील अचूकता वाढवून, कृषी विषयक सल्ला देणे हे आव्हानात्मक काम आहे.
आयएमडीकडून सध्या जिल्हा स्तरावर हवामान अंदाज देण्यात येत आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या वेळी आयएमडीचे उपमहासंचालक एस. डी अत्री म्हणाले, तालुकास्तरीय अंदाज देण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर कुशल मनुष्यबळाची भरती करण्यात येत आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर २०० तालुक्यांमध्ये अंदाज दिले जात आहेत. मात्र २०२० पर्यंत देशातील सर्वच जिल्ह्यामधील ६५०० तालुक्यांसाठी अंदाज देण्याचे उद्दिष्ट आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २३ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
46
0
संबंधित लेख