AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
‘आयआयटीएम’ देणार दशकाचा हवामान अंदाज
कृषी वार्ताअॅग्रोवन
‘आयआयटीएम’ देणार दशकाचा हवामान अंदाज
पुणे – देशाची धोरणे, पंचवार्षिक योजना ठरविताना हवामानातील बदलांचा विचारही करणे आवश्यक आहे. त्यामुळे हवामान विभागातर्फे दशकासाठीचा हवामान अंदाज देण्यात येणार आहे. भारतीय उष्णकटींबधीय हवामान संस्थेच्या (आयआयटीएम) माध्यमातून देण्यात येणाऱ्या अंदाजामुळे दशकात हवामानात होणारे संभाव्य बदल, पावसाची शक्यता, तापमान याचा विचार करून धोरणे ठरविणे शक्य होईल, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी दिली. आयआयटीएम मध्ये आयोजित केलेल्या हवामान सेवांविषयी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनानंतर राजीवन पत्रकारांशी बोलत होते.
राजीवन म्हणाले, “आयआयटीएमच्यावतीने चालू शतकाच्या शेवटपर्यंतच्या हवामान स्थितीविषयी अंदाज देण्यात आला आहे. देशाचे तापमान किती वाढेल, पाऊस कमी होईल की अधिक होईल, याचा विचार करण्यात आला आहे. मात्र सध्या दशकाच्या हवामान अंदाजाचा सध्या अधिक उपयोगी ठऱणार आहे. हा अंदाज देण्यासाठी समुद्रातील हवामान नोंदीचा आधार घेऊन हा अंदाज देण्यात येईल.” संदर्भ - अ‍ॅग्रोवन, १३ फेब्रुवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर फोटोच्या खाली असलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांद्वारे आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
31
0
इतर लेख