AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी मूग, उडीद आणि चवळीतील कीटक ओळखा आणि त्यांचे नियंत्रण करा.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
उन्हाळी मूग, उडीद आणि चवळीतील कीटक ओळखा आणि त्यांचे नियंत्रण करा.
तुडतुडे: डिंभ आणि प्रौढ कीटक फिकट हिरव्या रंगाचे असतात आणि नागमोडी रेषेत चालतात. डिंभांना पंख नसतात. डिंभ आणि प्रौढ कीटक पानांच्या खालच्या पृष्ठभागातून रस शोषतात, जर जास्त प्रा्दुर्भाव असेल तर, पाने कपाच्या आकाराची होतात. एकात्मिक व्यवस्थापन • जर प्रादुर्भाव जास्त असेल तर डायमिथोएट 30 EC 10 मिली किंवा फॉस्फॅमिडॉन 40 SL 10 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 SL 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारा, म्हणजे या किडीचे प्रभावी नियंत्रण होईल. • पेरणीपूर्वी, जर दाणेदार कार्बोफ्युरॉन 3 ग्रॅम 33 किग्रॅ/हेक्टर किंवा फोरेट 10 ग्रॅम @ 10 किग्रॅ/हेक्टर वरंब्यावर घातले, तर सुरुवातीच्या अवस्थेत पिकाचे तुडतुड्यांमुळे होणारे नुकसान टाळता येते. जर उभ्या पिकात प्रादुर्भाव दिसून आला तर, डायमेथोएट 30 EC 10 मिली किंवा फॉस्फेमिडॉन 40 SL 10 मिली किंवा थायोमेथोक्साम 25% WG किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 SL किंवा फ्लोनीकामिड 50 WP 4 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घालून फवारा. फुलकिडे: डिंभ आणि काळ्या रंगाचे प्रौढ कीटक पाने, कळ्या आणि फुलांवर चट्टे तयार करतात आणि त्यातून बाहेर येणारा रस शोषतात. परिणामी फुले आणि कळ्या वाळतात आणि उत्पन्नावर थेट परिणाम होतो. एकात्मिक व्यवस्थापन • प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात, 500 ग्रॅम निंबोळी अर्क (5% अर्क) किंवा 20 मिली (1 EC) ते 40 मिली (0.15 EC) निंबोळीवर आधारित औषध 10 लिटर पाण्यात मिसळा आणि झाडावर फवारा. • अॅसिफेट 75 SP 10 ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस 40 EC 10 मिली किंवा डायफेनथीयुरॉन 50 WP किंवा फिप्रोनील 5 SC 20 मिली किंवा इथीऑन 50 EC 10 मिली किंवा स्पिनोसॅड 45 SC 3 मिली 10 लिटर पाण्यात मिसळा आणि फवारा.
ठिपकेदार बोंडअळी: ही कीड अळी अवस्थेत चवळी,मूग आणि उडदाच्या फुले, कळ्या आणि शेंगांच्या भोवती जाळी तयार करते. त्याच्या आत ती राहते आणि दाण्यांवर उपजीविका करते आणि स्वत:च्या विष्ठेने जाळ्याचा प्रवेश बंद करते. एकात्मिक व्यवस्थापन • निंबोळीचा 500 ग्रॅम (5% अर्क) किंवा 50 मिली निंबोळी तेल किंवा 20 मिली (1 EC) ते 40 मिली (0.15 EC) निंबोळीवर आधारीत औषध 10 लिटर पाण्यात मिसळून रोपावर फवारा. • क़्विनालफॉस 25% EC @ 20 मिली किंवा ट्रायझोफॉस 40 % + सायपरमेथ्रीन 4% (44 EC) (10 मिली) किंवा डायक्लोरव्हॉस 76 EC 7 मिली किंवा ल्युफेन्यूरॉन 5 EC 10 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36 SL 10 मिली किंवा थायोडीकार्ब 75 WP 20 मिली किंवा क्लोरानट्रानिलीप्रोल 18.5 SC 3 मिली 10 लिटर पाण्यात मिसळावे आणि फवारावे. खोड माशी: प्रादुर्भाव उन्हाळ्यात जास्त आढळतो. ही पानाचा वरचा भाग पोखरते आणि मऊ खोडात छिद्रे पाडते. जास्त प्रादुर्भाव लहान रोपात दिसतो. लहान रोपात वरची दोन पाने गुंडाळली जाणे हे या किडीने केलेले गंभीर नुकसान आहे. काहीवेळा अन्नद्रव्य कमतरतेमुळे सुद्धा झाड रंग बदलताना दिसते. एकात्मिक व्यवस्थापन • खोल नांगरट करावी आणि जमीन उन्हाळ्यात चांगली तापवावी. • पिकाच्या पेरणीपूर्वी जर 30 किग्रॅ/हेक्टर प्रमाणे 3 ग्रॅम दाणेदार कार्बोफ्युरॉन पिकाला दिले तर प्रभावी नियंत्रण करता येते. • ही कीड शेताच्या बांधावरील गोखरूच्या झाडांवर उपजीविका करते, त्यामुळे ही झाडे नष्ट करावीत. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आनंद 388 110 (गुजरात भारत)
76
2
इतर लेख