आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आपण कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा ओळखाल?
कापूस पिकामध्ये बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्यास, फुले गुलाबांच्या फुलासारखी दिसतात, बोंडांचा आकार किंचित बदलतो, तसेच बोंडावर लहान छिद्र दिसून आत गुलाबी रंगाची अळी किंवा रिकामे कोष दिसतात, आतील बिया खाल्ल्या जातात, इत्यादी गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आढळतात. याच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफॉस ३५% ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!