AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओबॅरिक्स अ‍ॅग्रो सायन्स प्रा. लिमिटेड
पहा, पिकामध्ये फळ माशी नियंत्रणासाठी सापळा कसा लावला जातो.
शेतकरी बांधवांनो आपले पीक निरोगी व कीड मुक्त ठेवण्यासाठी पिकामध्ये फळ माशी सापळे बसवावे. हा सापळाद्वारे पिकातील किडींच्या प्रादुर्भावाचा अंदाज घेता येतो. या सापळ्यामध्ये एक प्लायवूडचा ठोकळा ठेवला जातो. फळमाशीला आकर्षित करण्यासाठी या ठोकळ्याला मिथाईल युजेनॉन/ क्यू ल्युरने तसेच कीटकनाशकाने संस्कारित केलेले असते. या सापळ्याकडे फळ माशी आकर्षित होतात. फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी ६-८ सापळे या प्रमाणात शेतामध्ये ४ ते ५ फूट किंवा पिकाच्या उंचीप्रमाणे शेतात अथवा झाडावर टांगून द्यावेत. याच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा._x000D_
संदर्भ:- बॅरिक्स अ‍ॅग्रो सायन्स प्रा. लिमिटेड_x000D_ _x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
111
8
इतर लेख