जैविक शेतीअॅग्रोवन
जैविक पद्धतीने जरबेरा पिकाची लागवड
जरबेराची फुले ही आकर्षित असतात. या फुलांचा ताजेपणा, टिकाऊपणा या गुणधर्मामुळे हे शोभिवंत फुले लग्नकार्यात, समारंभात आणि फुलांचे गुच्छ बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. या फुलांचे मार्केटमधील व्यावसायिक मूल्य जास्त आहे. बाजाराच्या वाढत्या मागणीमुळे भारतातील या फुलशेतीची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. पिकामध्ये जिवाणू खतांचा वापर: अॅझोस्पिरिलम ५०० ग्रॅम, स्फुरद विरघळणारे जिवाणू खत ५०० ग्रॅम, ट्रायकोडर्मा ५०० ग्रॅम प्रति १० किलो शेणखत या प्रमाणात वेगवेगळे मिश्रण करून ८ - १० दिवस प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. यानंतर तिन्ही एकत्र करून ५०० चौ. मी. हरितगृहातील जरबेरा पिकास लागवडीनंतर तीन आठवड्यांनी द्यावे. रोग नियंत्रण: पिकावर वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत मुख्यत्वे मूळ किंवा खोड कूज या रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगकारक बुरशी: रायझोक्टोनिया, फ्युजॅरियम, पिथियम, फायटोप्थोरा आणि स्क्लेरोशियम. लक्षणे: या रोगामुळे रोपवाटिकेत रोपांची मर होते. लागवडीनंतर जमिनीलगतच्या खोडावर बुरशीची वाढ होऊन त्या ठिकाणी खोडाचा भाग कुजतो आणि कालांतराने पूर्ण झाड सुकते. पाण्याचा चांगला निचरा न झाल्यास आणि आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. उपाय: • या फुलांच्या लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. त्यानंतर गादीवाफे करून ७ ते १० दिवसांनी लागवड करावी. • निरोगी रोपांची लागवड करावी. • लागवड करताना पिकाच्या पूर्व नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास ही जैविक बुरशीनाशके ५०० ग्रॅम प्रति १० किलो शेण खत या प्रमाणात वेगवेगळे मिसळून वापरावे. • पाण्याचा योग्य निचरा करावा. झाडांच्या मुळा आणि खोडा भोवतालचा जमिनीतील ओलावा कमी करावा. सूचना : • द्रावणाची दर महिन्याच्या अंतराने झाडाच्या खोडा व मुळाभोवती आळवणी करावी. • खतांचा शिफारशीनुसार संतुलित वापर करावा. संदर्भ : अॅग्रोवन
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
285
0
संबंधित लेख