AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
द्राक्ष गोडी छाटणी व्यवस्थापन:- भाग-1
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
द्राक्ष गोडी छाटणी व्यवस्थापन:- भाग-1
येणारा हंगाम द्राक्ष पिकासाठी सर्वात महत्वाचा असून महाराष्ट्रामधील बहुसंख्य परिसरात सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान सर्वाधिक गोडी छाटणी घेतली जाते. छाटणी पुर्वी सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन हाच होय.
अन्नद्रव्ये व्यवस्थापनात पुढील काही महत्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव असणे गरजेचे आहे त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. द्राक्ष वेली असू अन्यथा कोणतेही बागायती फळ पिक असल्यास मुख्य, दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये अशा एकंदरीत 16 घटकांची गरज असते. यामध्ये मुख्य असे नत्र, स्फुरद आणि पालाश दुय्यम असे गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम व सुक्ष्म मध्ये जस्त, लोह, मंगल, तांबे, बोरॉन आणि मोलाब्द यांची गरज असते. या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता वेळोवेळी पूर्ण झाल्यास येणारे उत्पादन गुणवत्तापूर्ण आणि भरघोस होते. द्राक्ष बागेला खातांचा वापर खालील प्रमाणे करावा- नियमित माती असल्यास 18:46 (डी. ए. पी) 100 किलो, सल्फेट ऑफ पोटॅश 75 किलो, गंधक 5 किलो, झिंक सल्फेट 10 किलो, फेरस सल्फेट 7 किलो, बोरॅक्स 3 किलो, कॅल्शियम नायट्रेट 10 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो प्रती एकर वापरावे. चुनखडी युक्त जमीन असल्यास युरिया 50 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 200 किलो, सल्फेट ऑफ पोटॅश 75 किलो देऊन उर्वरित अन्नद्रव्ये वर सांगितल्या प्रमाणेच द्यावीत. रासायनिक खातांसोबातच सेंदीय खताचा वापर महत्वाचा असून जास्त माल निघून घड जिरणे टाळण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर अत्यावश्यक आहे यामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा गांढूळ खत वापरावे. दुसरा पर्याय हिरवळीची खते जसे की ताग आणि धेंचा भोदावर गाडून जमिनीची जडणघडण सुधारू शकतो. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील नत्र-कर्ब गुणोत्तर सुधारते (1:10 हे गुणोत्तर योग्य मानले जाते). जेव्हा कर्ब-नत्र गुणोत्तर योग्य राहते तेव्हा कुठल्याही प्रकारे माल निघण्यास अडथळा येत नाही तसेच घड जिरण्याचे प्रमाणही कमीत कमी राहते. घड जिरू नये यासाठी मोठ्या प्रमाणात संजीवके वापरली जातात ज्यांचा खर्च वारेमाप असतो, यावर खर्च करण्यापेक्षा जर नत्र-कर्ब गुणोत्तरावर लक्ष देऊन काम होणे आवश्यक आहे. द्राक्ष वेलींना खते देण्यासाठीची योग्य पद्धत- खते देताना दोन वेलींच्या मध्ये फावडीच्या सहाय्याने चळी मारावी ज्याची रुंदी 1 फुट लांबी निदान 3 फुट आणि खोली 10 ते 15 सेंटीमीटर ठेवावी. या चळीमध्ये सर्वात खाली शेणखत किंवा हिरवळीचे खत ठेवावे त्यानंतर वरतून सर्व रासायनिक खतांची मात्रा पसरून द्यावी नंतर सर्वात वर मातीने हलकेसे झाकून घ्यावे. या चळीच्या बरोबर वरच्या साईड ला ड्रीप ठेवावे जेणेकरून पाणी सरळ दिलेल्या अन्नद्रव्यांच्या मिश्रणावर पडेल आणि पुढे जाऊन सर्व मुळी त्या जागीच वाढेल या ठिकाणी हवा खेळती राहिल्यामुळे अनेक फायदे होतील.
228
3