AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
साखर उदयोगांसाठी साठवणूक वाढविण्याची तयारी
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
साखर उदयोगांसाठी साठवणूक वाढविण्याची तयारी
केंद्र सरकार साखर मिलसाठी लागणारी साठवणूक ही ३० लाख टनने वाढवून ५० लाख टन करण्याची शक्यता आहे. यासाठी खाद्य मंत्रालयने कॅबिनेटमध्ये एक संदर्भ जाहिर केला असून, पुढील आठवडयात कॅबिनेट बैठकीमध्ये याचा निर्णय होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा वेग वाढविण्यासाठी शासनाने साखर मिलला जवळजवळ १,१०० करोड रूपयांचे अनुदान देण्याची शक्यता आहे. खादय मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकारीनुसार, साखरेची साठवणूक वाढवून ती ५० लाख टन करण्याचा प्रस्ताव आहे, तो यंदा ३० लाख टन आहे. त्याचबरोबर साठवणुकीच्या कालावधीला एक वर्षासाठी वाढविण्याचादेखील प्रस्ताव आहे. यावर जवळजवळ १,१०० करोड रूपयांचे अनुदान दिले जाऊ शकते. या प्रस्ताववर पुढील आठवडयात कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. पहिल्या ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेल्या चालू पेरणी हंगाम २०१८-१९ (ऑक्टोबर ते सप्टेंबर) मध्ये साखर मिलमध्ये पेरणी बंद झाल्यानंतर ही ऊस शेतकऱ्यांचे १८, ९५८ करोड रू. उत्पन्न शिल्लक आहे. उत्पन्नात सर्वात जास्त वाटा उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातील शेतकऱ्यांचा आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २४ जून २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
7
0