क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील गर्डल बीटलचे नियंत्रण!
• प्रौढ भुंग्याचे पंख कळ्या भुरकट रंगाचे असतात त्यामुळे ते सहज ओळखू येतात. • पिकाच्या सुरुवातीच्या काळात मादी भुंगे देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालतात, त्यामुळे अन्नपुरवठा बंद होतो आणी खापाच्या वरचा भाग वाळून जातो. • अळ्या पिवळ्या रंगाच्या असून त्याच्या खालील भागावर उभारट ग्रंथी असतात. • अळ्या देठ, फांदी आणी खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहचतात. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.  नियंत्रण- • कीडग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत. • पिकाची काढणी झाल्यानंतर पिकाचे उर्वरित अवशेष नष्ट करावे. • पीक ताणविरहित ठेवावे. • नत्रयुक्त खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा. • प्रतिबंधात्मक नियंत्रण म्हणून इमिडाक्लोप्रिड ६०० एफएस @९ मिली प्रति किलो बियाणे प्रमाणात बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते. • बियाणे पेरणीनंतर वेळोवेळी फोरेट १० जी @१० किलो प्रति हेक्टर द्यावे. • अधिक प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास नियंत्रणासाठी क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५ एससी @३ मिली किंवा इंडोक्साकार्ब १५.८ ईसी @१० मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ४.९ सीएस @५ मिली या थायोक्लोप्रिड २१.७ एससी @१० मिली या प्रोफेनोफॉस ५० ईसी @१० मिली किंवा ट्रायझोफॉस ४० ईसी @२० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
31
13
संबंधित लेख